India vs Pakistan Match In Asia Cup 2023 Will Start At What Time Know Updates ; भारत आणि पाकिस्तानचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पल्लिकल : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सामन्याचा एकही क्षण चुकू नये, असे सर्वांनाच वाटत असणार. आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानात झाला होता, तर हा सामना श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळेहा सामना भारतीय वेळेनुसार नेमका किती वाजता सुरु होणार, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यतील सामन्यासाठी मैदानातील पंच हे दुपारी १.३० वाजता येऊन मैदानाची पाहणी करतील. जर पाऊस पडलेला नसेल तर सारे काही सुरळीत होऊ शकते. पण पाऊस पडला असेल तर प्रथम पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर मैदान कधी सुकवले जाते, हे पाहावे लागेल. मैदान सुकल्यावर पंच मैदानाची पाहणी करतील आणि ते समाधानी असतील तर ते सामन्याला कधी सुरुवात होणार, हे जाहीर करतील. जर पाऊस नसेल तर या सामन्याचा टॉस हा दुपारी २.३० वाजता होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार आपला संघ जाहीर करतील. त्यानंतर खेळाडू काही काळ मैदानात सराव करतील. टॉस झाल्यावर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी ३.०० वाजता सामना सुरु केला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना पल्लिकल येथे होणार आहे. पल्लिकलमध्ये शनिवारी जोरदार पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. पण तरीही हा सामान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सामन्याचा एकही क्षण चाहत्यांना चुकवता येणार नाही. कारण बऱ्याच महिन्यांनी हा सामना होत असल्यामुळे चाहत्यांंचे त्याकडे लक्ष लागलेले असेल.

सामना : भारत वि. पाकिस्तान
वेळ : दुपारी ३ पासून
स्थळ : पल्लिकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

भारत गेल्या पाच वनडेंत : दोन विजय, तीन पराभव

पाकिस्तान गेल्या पाच वनडेंत : चार विजय, एक पराभव

भारत वि. पाकिस्तान गेल्या पाच वनडेंत

-)२०१९ वर्ल्ड कप : डकवर्थ लुइस नियमानुसार भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय

-)२०१८ आशिया कप : भारताची पाकिस्तानवर ९ विकेट राखून मात.

-)२०१८ आशिया कप : भारताचा पाकिस्तानवर आठ विकेटने विज.

-)२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा १८० धावांनी पराभव.

-)२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी : डकवर्थ लुइस नियमानुसार भारत १२४ धावांनी विजयी.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे. त्यामुळे हा सामने कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts