If Rohit Sharma Change One Thing Then Mumbai Indians Win IPL LSG vs MI Eliminator ; रोहित शर्माने फक्त एकच गोष्ट सुधारली तर मुंबईचा विजय पक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : मुंबई इंडियन्सचा संघ एलिमिनेटरमध्ये पोहोचला खरा. पण त्यांची एक गोष्ट अजूनही सुधारली गेलेली नाही आणि त्यामुळेच त्यांना पारभवाचा धक्का बसू शकतो. पण रोहित शर्माने जर ही एकच गोष्ट सुधारली तर नक्कीच मुंबईला विजय मिळवता येऊ शकतो.मुंबईता संघ हा चांगला समतोल आहे, असे सध्याच्या घडीला म्हटले जात नाही. मुंबईचा संघ विजय मिळवत आहे, कारण ते धावांचा पाठलाग करत आहेत. मुंबईची फलंदाजी ही जमेची बाजू आहे. रोहित शर्माला सध्याच्या घडीला चांगलाच सूर सापडला आहे. कॅमेरून ग्रीन हा भन्नाट फॉर्मात आला आहे. या दोघांबरोबरच सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, टीम डेव्हिड असे एकामागून एक फलंदाज मुंबईच्या संघात आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाला फलंदाजीची भिती नाही. समोरच्या संघाने दोनशे धावा जरी केल्या तरी मुंबईचा संघ ते आव्हाप सहजपणे पार करू शकतो.आतापर्यंच मुंबईच्या संघाने बऱ्याचदा २०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान पूर्णही केले आहे. मुंबईचा संघ एवढी चांगली कामगिरी करत आहे, पण एक गोष्ट त्यांचा घात करू शकते.

मुंबईच्या संघाला या आयपीएलमध्ये दोन धक्के बसले. जसप्रीत बुमराह या आयपीएललमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या जागी मुंबईच्या संघाने जोफ्रा आर्चरला संधी दिली होती. पण आर्चर फक्त काहीच सामने खेळला आणि त्यालाही दुखापत झाली. हे दोन धक्के मुंबईला बसले आणि त्यामुळेच त्यांची गोलंदाजीची बाजू अजूनही कमकुवत आहे. कारण जेसन बर्डनहॉफ चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला चांगली साथ मिळत नाही. सध्याच्या घडीला जेसन आणि पीयुष चावला हे दोघेच सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाने जरी २०० धावांचता पल्ला गाठला तरी त्यांना सामना गमवावा लागू शकतो. त्यामुळे मुंबईच्या संघाने जर आपली गोलंदाजी सुधारली तर नक्कीच त्यांचा विजय होऊ शकतो. त्यामुळे मुंबईने गोलंदाजी सुधारली तर त्यांना नक्कीच विजय मिळू शकतो.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

मुंबईला यापूर्वी लखनौला पराभूत करता आलेले नाही. पण या सामन्यात मात्र ते लखनौच्या संघाला धक्का देऊ शकतात.

[ad_2]

Related posts