IND Vs PAK Asia Cup 2023 Team India Playing 11 KL Rahul Replaces Shreyas Iyer India Vs Pakistan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात महत्वाच्या सामन्यात टीम इंडियात दोन बदल करण्यात आले आहेत. केएल राहुलने दुखापतीनंतर कमबॅक केलेय. तर जसप्रीत बुमराहचेही टीम इंडियात पुनरागमन झालेय. बुमराहच्या आगमनामुळे मोहम्मद शामी याला डच्चू देण्यात आला आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या जागी केएल राहुल याला संधी देण्यात आली आहे. 

श्रेयस अय्यर याने दुखापतीनंतर नुकतेच टीम इंडियात कमबॅक केले होते. त्याची पुन्हा एकदा पाठीची दुखापत बळावली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात अय्यरला प्लेईंग 11 मधून बाहेर बसावे लागले. अय्यरच्या जागी केएल राहुल याला स्थान मिळाले आहे. इशान किशन की केएल राहुल, प्लेईंग 11 मध्ये कुणाला स्थान मिळणार अशी चर्चा सुरु होती. अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोघांनी प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. 

श्रेयस अय्यर याला पाठदुखीमुळे पाकिस्तानविरोधात खेळू शकत नाही, अशी माहिती कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी दिली. अय्यरच्या जागी राहुलला स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 

भारताचे 11 शिलेदार कोणते?

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.

वनडेमध्ये पाकिस्तानविरोधात राहुलची कामगिरी – 

केएल राहुल याने पाकिस्तानविरोधात फक्त एक वनडे सामना खेळला आहे. 2019 च्या विश्वचषकात केएल राहुलने पाकिस्तानविरोधात एकदिवसीय सामना खेळला आहे. या सामन्यात राहुल याने 57 धावांची खेळी केली होती. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 

केएल राहुल तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचा सदस्य –

केएल राहुल भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत 47 कसोटी, 54 वनडे आणि 72 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये केएल राहुल याने 2642 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये  1986 आणि टी20 मध्ये 2265 धावा केल्या आहेत. 



[ad_2]

Related posts