Why Did France Banned Apple Iphone 12 Model Phone New Iphone Latest News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ॲपल कंपनीने (Apple) नुकताच बहुप्रतिक्षित आयफोन 15 सीरिज (iPhone 12 Series) लाँच केली आहे. असं असताना ॲपल (Apple) कंपनीला मात्र झटका बसला आहे. फ्रान्समध्ये आयफोन 12 (iPhone) वर बंदी घालण्यात आली आहे. आयफोन 12 घातक रेडिएशन पसरवत असल्याचा आरोप फ्रान्सची मॉनिटरिंग संस्था ANFR  ने आयफोन 12 मानकांपेक्षा अधिक रेडिएशन परसवत असल्याचा आरोप केला आहे. हे रेडिएशन आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचं म्हटलं जात आहे. 

फ्रान्समध्ये आयफोन 12 विक्रीवर बंदी

फ्रान्स नॅशनल फ्रिक्वेन्सी एजन्सी (ANFR-Agence Nationale des Frequences) ने दिलेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनीच्या आयफोन 12 मॉडेलवर SAR (Specific Absorption Rate) म्हणजेच युरोपियन युनियन (EU) कडून मान्यता असलेलं रेडिएशन लिमिट जास्त आढळल्याचं सांगण्यात आलं आहे. आयफोन 12 मध्ये मानकापेक्षा जास्त रेडिएशन असल्याचा दावा फ्रान्सच्या ANFR संस्थेनं केला आहे. यामुळे फ्रान्सने आयफोन 12 मॉडेलच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

आयफोन 12 मुळे रेडिएशन पसरत असल्याचा आरोप

फ्रान्सच्या डिजिटल इकोनॉमी डिपार्टमेंटचे मंत्री जीन बारोट यांनी सांगितलं की, ॲपल कंपनीने या समस्येवर तोडगा न काढल्यास फ्रान्समधून सर्व आयफोन 12 चे मॉडेल्स परत पाठवण्यात येतील. आयफोन 12 मधील रेडिएशनची समस्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे दूर केली जाऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

आयफोन 12 संदर्भातील आरोप ॲपल कंपनीने फेटाळले

ॲपल कंपनीने आयफोन 12 च्या रेडिएशन संदर्भातील सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. ॲपल कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, आयफोन रेडिएशन संबंधित जागतिक नियमांचे पालन करतो. आयफोन 12 चं जुनं मॉडेल 2020 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. आयफोन 12 रेडिएशन संबंधित सर्व नियमाचं पालन करतो.

SAR म्हणजे काय?

एसएआर (SAR) म्हणजे स्टँडर्ड अब्जॉर्प्शन रेट. याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे तयार होणारं रेडिएशन जे मानवी शरीरावर पडतं. थोडक्यात SAR म्हणजे मानवी शरीरावर रेडिएशनचा होणारा परिणाम. SAR ची मान्यता प्राप्त मर्यादा किंवा मानक असतात. ठराविक मानकांपर्यतचं रेडिअशन मानवी शरीरासाठी हानिकारक नसतं. त्याउलट मानकापेक्षा अधिक रेडिएशनचा मानवी शरीरावर वाईट परिणाम होतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 



[ad_2]

Related posts