Ind Vs Aus 1st Odi Suryakumar Yadav Staement After 50 Runs Inning Against Australia And Told The Reason Why He Was Continuously Failing In Odi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Suryakumar Yadav Statement After His Fifty : ऑस्ट्रेलियाविरोधात मोहाली वनडे सामन्यात भारताने पाच विकेटने बाजी मारली. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. सूर्या फॉर्ममध्ये परतल्याने टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. सूर्य कुमार यादवने १९ महिन्यानंतर वनडेमध्ये अर्धशतक ठोकले.  त्याने ४९ चेंडूत ५० धावांची खेळी केली. विश्वचषकाआधी सूर्याच्या बॅटमधून निघालेले शतक भारतीय चाहत्यांना दिलासा देणारे आहे.  धाकड अर्धशतकानंतर सूर्यकुमार यादव याने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत महत्वाचे वक्तव्य केले. सूर्या नेमका कुठे चुकत होता… त्यामुळे वनडेमध्ये वारंवार संधी मिळूनही धावा काढण्यात अपयश येत होते. वनडेमध्ये धावा काढण्यात सूर्याला संघर्ष का कारावा लागत होता.. याबाबत सूर्याने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.   

मोहाली वनडेमध्ये दमदार अर्धशतक ठोकल्यानंतर सूर्यकुमार यादव याला फलंदाजीबाबत विचारले. सूर्या वनडेतील फलंदाजीबाबत म्हणाला की,  जेव्हा मी या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली तेव्हा मी अशा प्रकारच्या डावाची कल्पना करत होतो. जिथे मी शेवटपर्यंत फलंदाजी करू शकेन आणि सामना पूर्ण करू शकेन. मात्र, आजच्या या सामन्यात मला हे करण्यात यश मिळू शकले नाही. पण मी माझ्या कामगिरीवर नक्कीच खूश आहे.

चुकांबद्दलही सूर्याने मत व्यक्त केले. तो म्हणाला की, वनडेमध्ये फलंदाजी करताना मी थोडी घाई करत असल्याचे मला जाणवले. या सामन्यात मी थोडा संथ, संयमी खेळण्याचा आणि शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला. एखाद्या सामन्यात स्वीप शॉट न खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. मी अशीच फलंदाजी करत राहू शकतो आणि शेवटपर्यंत खेळून संघाला विजय मिळवून देऊ शकतो.

सूर्याची वनडेतील कामगिरी कशी राहिली आहे….

टी२० चा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला वनडेमध्ये छाप सोडता आली नाही. सूर्यकुमार यादवला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमार यादवला वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यातील 26 डावात  सूर्याने  25.52 च्या सरासरीने 587 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या नावावर 3 अर्धशतकेही आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 64 धावा आहे.  



[ad_2]

Related posts