[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asian Games 2023 Cricket Final : आशियाई खेळ 2023 मध्ये क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्या अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. भारताने (Team India) उपांत्य फेरीत बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला तर, अफगाणिस्तान (Afghanistan) ने उपांत्य फेरीत पाकिस्तान (Pakistan) चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि आफगाणिस्तान यांच्यात आज सुवर्णपदकासाठीचा सामना रंगणार आहे. आशियाई खेळ 2023 मधील क्रिकेटचा अंतिम सामना आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चीनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हांगझाऊ येथील झेजियांग युनिव्हर्सिटीऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट स्टेडिअमवर रंगणार आहे. सकाळी 11.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या अंतिम सामन्यातील संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात रात्री 11 वाजता नाणेफेक होणार आहे. त्याचवेळी सकाळी 11.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी भारताने पहिल्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा नऊ विकेट्सने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत नऊ गडी गमावून 96 धावा केल्या. साई किशोरने तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले.
भारत की अफगाणिस्तान सुवर्णपदकाचा मानकरी कोण ठरणार?
प्रत्युत्तरात टीम इंडियाकडून तिलक वर्माने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. तिलक वर्माने 26 चेंडूत 55 धावांची उत्तम खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने केलेल्या 26 चेंडूत 40 धावा केला. या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 9.2 षटकात एक विकेट गमावून सामना जिंकला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा चार विकेट्सने पराभव करत स्पर्धेला रोमांचक वळण दिलं. त्यानंतर आज अंतिम फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, साई किशोर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद.
अफगाणिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन
नूर अली जद्रान, मोहम्मद शहजाद, अफसर झझाई, सेदीकुल्लाह अटल, कैस अहमद, फरीद अहमद, झहीर खान, शराफुद्दीन अश्रफ, गुलबदिन नायब, करीम जनात आणि शहिदुल्ला कमाल.
कुठे पाहाल सामना?
आशियाई क्रीडा 2023 पुरुष क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार असून तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिनीवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर, तुम्ही सोनी लिव्ह (Sony Liv) अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
[ad_2]