India Pakistan Match Duplicate Tickets Identify Ind Vs Pak ODI World Cup 2023 Ahmedabad Narendra Modi Stadium Sports Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK Match Tickets: संपूर्ण देश ज्याच्याकडे डोळे लावून बसला आहे. तो विश्वचषकातला (ODI World Cup 2023) हायव्होलटेज सामना म्हणजे, टीम इंडिया (Team India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan). शनिवारी 14 ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) मैदानात उतरणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Ahmedabad Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या टाईमटेबलची घोषणा होण्यापूर्वीपासूनच चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता होती. अशातच सामन्याची घोषणा झाली आणि तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. तिकीट स्लॉट सुरू होण्यापूर्वीपासूनच चाहत्यांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. अजूनही चाहते तिकीट मिळवण्यासाठी वाटेल ती किंमत चुकवण्यासाठी तयार आहेत. पण आता यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा एवढी दांडगी आहे की, त्यामध्ये ती फसवणुकीलाही बळी पडत आहेत. 

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी चाहेते बेभान झाले आहेत. याचाच फायदा काही भामट्यांनी घेतला असून बनावट तिकीट विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. टीम इंडिया – पाकिस्तान सामन्याच्या बनावट तिकिटांचा बाजार सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही जर या सामन्याचं तिकीट खरेदी केलं असेल किंवा खरेदी करण्याच्या विचारात असाल तर वेळीच सावध व्हा आणि तुमच्याकडे असलेलं तिकीट किंवा तुम्ही खरेदी करत आहात ते तिकीट बनावट तर नाही ना? हे तपासून पाहा.  

अहमदाबाद क्राईम ब्रांचकडून बनावट तिकिटं बनवणारी टोळी गजाआड

खरी आणि बनावट तिकिटं कशी ओळखायची? दरम्यान, पोलिसांनी सर्वसामान्यांना खरं तिकीट ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. अहमदाबाद गुन्हे शाखेनं 50 बनावट तिकिटांसह 4 जणांना पकडलं आहे. तसेच, या भामट्यांना बनावट तिकिटं बनवताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.  

खरी आणि बनावट तिकिटं कशी ओळखायची?

  • डायनामिक कलर- इन्फ्यूज्ड पेपर : टीम इंडिया विरुद्धा पाकिस्तान या सामन्यासाठी डायनामिक कलर- इन्फ्यूज्ड पेपर वापरण्यात आला आहे. जर तुम्ही तिकीट थोडसं जरी फाडलं किंवा तिकीटासोबत काहीही छेडछाड झाली, तर त्याचा रंग बदलून ते पिंक कलरचं दिसेल. 
  • तिकिटामध्ये छेडछाड : स्पष्ट शून्य वैशिष्ट्य समाविष्ट केलं गेलं आहे, ज्यामुळे कोणतेही बदल सहज ओळखता येतील.
  • मॅक्रो सुरक्षा लेन काळजीपूर्वक एकत्रित केली गेली आहे, जी केवळ भिंगाच्या मदतीनं पाहिली जाऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही खरं आणि बनावट तिकिट ओळखू शकता.
  • याशिवाय, प्रत्येक तिकीट स्वतंत्र बारकोडसह येतं, जेणेकरून तिकीट खरं आहे की, बनावट हे सहज ओळखता येतं.

[ad_2]

Related posts