[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shreyas Iyer And Suryakumar Yadav : विश्वचषकात श्रेयस अय्यर याला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आघाडीच्या विकेट पडल्यानंतरही चुकीचा फटका मारुन अय्यर बाद झाला. आतापर्यंत भारतीय संघाने सहाही सामन्यात विजय मिळवलाय, पण हीच कमकुवत बाजू पुढील सामन्यात डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव अथवा ईशान किशन संधी द्या..या मागणीने जोर धरलाय.
दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली, ज्याचा त्याने चांगला फायदा घेतला. तर श्रेयस अय्यर या स्पर्धेत अपयशी ठरला आहे. अय्यरला सहा साममन्यात फक्त एक अर्धशतक ठोकता आलेय. त्याला आतापर्यंत फक्त 134 धावा करता आल्यात. त्यामुळे हार्दिक पांड्या आल्यानंतर अय्यरचा पत्ता कट होणार, असाच अंदाज बांधला जातोय.
अय्यरला सक्तीचा आराम ?
दोन नोव्हेंबर रोजी मुंबईत टीम इंडिया श्रीलंकाविरोधात खेळणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याचे कमबॅक होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. हार्दिकच्या पुनरागमनानंतर सूर्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, आता श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म पाहता त्याला बेंचवर बसावे लागू शकते.
सूर्यकुमार यादव शानदार फिनिशिंग करु शकतो. शेवटच्या षटकांत झटपट धावा काढण्याची क्षमता सूर्याकडे आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्याचे आकडे खास नसले तरी संघाचा त्याच्यावर विश्वास आहे. सूर्याने टी-20 सामन्यात संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. सध्या अय्यरचा खराब फॉर्म असल्यामुळे सूर्याला संधी दिली जाऊ शकते.
चौथ्या क्रमांकावर अय्यर फ्लॉप –
2011 च्या विश्वचषकापासून भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, हे पडलेले कोडे सुटले नाही. 2023 च्या विश्वचषकात टीम इंडियाने श्रेयस अय्यर याला संधी दिली, पण तोही अद्याप शानदार कामगिरी करु शकला नाही. सहा सामन्यात अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरोधात अय्यरने अर्धशतक ठोकले, पण त्यावेळी भारतीय संघ सुस्थितीत होता. त्याशिवाय इतर सामन्यात अय्यरला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात श्रेयस अय्यर चुकीचा फटका मारुन बाद झाला. बाऊन्सर चेंडूवर अय्यर आपली विकेट फेकतो, हे प्रतिस्पर्धी संघाला आता समजलेय. त्यामुळे सेमीफायनलच्या आधी अय्यर फॉर्मात परतला नाही, तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो.
विश्वचषकात श्रेयस अय्यरची कामगिरी –
ऑस्ट्रेलिया – 0 धावा
अफगाणिस्तान – 23 चेंडूत 25 धावा
पाकिस्तान – 62 चेंडूत नाबाद 53 धावा
बांगलादेश – 25 चेंडूत 19 धावा
न्यूझीलंड – 29 चेंडूत 33 धावा
इंग्लंड – 16 चेंडूत 4 धावा
अय्यरची वनडे कामगिरी –
श्रेयस अय्यर याने 53 वनडे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्याने 1935 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके ठोकली आहेत.अय्यरने 15 अर्धशतकेही लगावली आहेत.
[ad_2]