World Cup 2023 Stats Records Most Run Batting Averages Strike Rate Most Wicket Highest Score

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup Stats  : भारतात सुरु असलेला विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. तीन सामन्यानंतर आपल्याला विजेता मिळेल. साखळी सामन्यावर भारताने वर्चस्व गाजवले. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघाने उपांत्य फेरतीत स्थान पटकावले. सहा संघाचे साखळी फेरतीच आव्हान संपुष्टात आले. प्रत्येक संघाने 9-9 सामने खेळले. साखळी फेरीत दहा संघामध्ये आतापर्यंत 45 सामने झालेत. त्यानंतर अनेक रोचक आकडेवारी समोर आली आहे. यामधील टॉप 10 खास आकडेवारी पाहूयात…. 

1. सर्वोच्च टीम स्कोर :  
यंदाच्या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर जमा आहे. आफ्रिकेने लंकेविरोधात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 428 धावांचा डोंगर उभारला होता.   

2. सर्वात मोठा विजय :
यंदाच्या विश्वचषकातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. कांगारुंनी दुबळ्या नेदरलँड्संचा 302 धावांनी पराभव केला.

3. सर्वाधिक धावा : 
यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा मान विराट कोहलीचा आहे. विराट कोहलीने नऊ सामन्यात पाच अर्धशतके आणि दोन शतकांच्या मदतीने  594 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणारा क्विंटन डिकॉक फक्त तीन धावांनी मागे आहे. 

4. सर्वोत्कृष्ट खेळी :
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने अफगाण गोलंदाजांची धुलाई केली होती. मॅक्सवेलने 128 चेंडूत नाबाद 201 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

5. सर्वात बेस्ट फलंदाजीतील सरासरी : 
यंदाच्या विश्वचषकात सर्वात बेस्ट सरासरीचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. विराट कोहली तीन वेळा नाबाद राहिलाय. 

6. जबराट स्ट्राइक रेट  :
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेटचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. मॅक्सवेलने 152.69 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. सात सामन्यात 260 चेंडूत 397 धावा त्याने चोपल्या आहेत. 

7. सर्वाधिक शतके : 
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. त्याने यंदा चार शतके ठोकली आहे. डिकॉकने नऊ डावात चार शतकाच्या मदतीने 591 धावा केल्यात.

8. सर्वाधिक षटकार :
रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करतो. पहिल्या चेंडूपासून रोहित आक्रमक फलंदाजी करतो. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक षटकाराचा विक्रम रोहिच्या नावावर आहे. रोहितने नऊ सामन्यात 28 षटकार मारलेत. मॅक्सवेल 26 षटकारासह दुसऱ्या स्थानावर आहे. 

9. सर्वाधिक विकेट :
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज एडम झम्पा याने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेतल्या. झम्पाने नऊ सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. मधुशंका दुसऱ्या स्थानावर आहे. 
  
10. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: 
मोहम्मद शामीने लंकेविरोधात 5 षटकात फक्त 18 धावा कर्च करत पाच विकेट घेतल्यात. ही विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे.  

[ad_2]

Related posts