[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : सध्या दिवाळीचं (Diwali 2023) वातावरण सगळीकडे पाहायला मिळतयं. अनेकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पण तुम्हाला माहित आहे की, यंदाच्या दिवळीत लोकांनी किती रुपयांची खेरदी केली? हे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण हा आकडा सध्याच्या स्थितीला जवळपास 3.75 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. यंदाच्या दिवाळीत खरेदीचे सर्व विक्रम मोडीत निघाल्याचं चित्र आहे. लोकांनी दिवाळीत काय खरेदी केली ते जाणून घेऊया.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी एका संयुक्त निवेदनात यासंदर्भात माहिती दिली. यंदाच्या दिवाळी हंगामात देशभरातील बाजारपेठांमध्ये 3.75 लाख कोटी रुपयांहून अधिकचा विक्रमी व्यापार झालाय. सर्व सणांच्या दिवशी भारतीय वस्तूंची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. वसुबारस, भाऊबीज आणि तुळशी विवाह हे सण अजूनही बाकी आहेत. त्यासाठी जवळपास 50 हजार कोटी रुपयांची आणखी खरेदी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
चीनला एक लाख कोटींचा झटका
या दिवाळीत चीनला 1 लाख कोटींहून जास्त नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी दिवाळीमध्ये चीनी वस्तू भारतीय बाजारपेठांमध्ये जवळपास 70 टक्के मिळत होत्या. पण यावेळी त्यांची उपलब्धता घटली असल्याचं पाहायला मिळतयं. देशातील व्यावसायिकांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात न करण्याचा पवित्रा घेतला.
‘या’ वस्तूंची झाली वेगाने विक्री
प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3.5 लाख कोटी रुपयांची जी खरेदी झाली त्यापैकी सुमारे 13% अन्न आणि किराणा, 9% दागिने, 12% कपडे आणि वस्त्रे, 4% सुका मेवा, मिठाई आणि स्नॅक्स, 3% घरगुती वस्तू. फर्निशिंग, 6% सौंदर्य प्रसाधने, 8% इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल, 3% पूजासामुग्री आणि पूजा साहित्य, 3% भांडी आणि स्वयंपाकघर उपकरणे, 2% मिठाई आणि बेकरी, 8% भेटवस्तू, 4% फर्निचर आणि फर्निचर आणि उर्वरित 20% ऑटोमोबाईल्स, ग्राहकांनी हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, खेळणी आणि इतर अनेक वस्तूंवर खर्च केला.
वोकल फॉर लोकलचा प्रभाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीमध्ये स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. ज्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला. देशातील सर्व शहरांतील स्थानिक उत्पादक, कारागीर आणि कलाकारांनी बनवलेल्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे दिवाळी सणाच्या माध्यमातून देश आणि जगाला स्वावलंबी भारताची खास ओळख निर्माण करुन देण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा :
muhurat trading 2023 : मुहू्र्त ट्रेडींगनंतर शेअर बाजारात दिवाळी! सेन्सेक्स 371 अंकांनी वधारला तर निफ्टी 19,500च्या वर, गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा नफा
[ad_2]