[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India Playing 11 Vs South Africa 1st Test : बॉक्सिंग डे कसोटी (Boxing day test) सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने आतापर्यंत आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे कसोटी मालिकेत आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माला इतिहास रचण्यास आतुर असेल.
🚨 Toss Update 🚨
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the first #SAvIND Test.
Follow the Match ▶️ https://t.co/Zyd5kIcYso pic.twitter.com/LEz1tNBbbB
— BCCI (@BCCI) December 26, 2023
जाडेजा संघाबाहेर –
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजा खेळताना दिसणार नाही. पाठदुखीमुळे रवींद्र जाडेजा पहिल्या कसोटीला मुकणार आहे. भारतीय संघ फक्त एका फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरलाय. आर. अश्विन हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल. तर चार वेगवान गोलंदाज आहेत.
भारतीय संघात कोण कोण ?
रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीची भूमिका पार पाडतील. तर शुभमन गिल आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह आणि सिराज यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल, त्यांच्या जोडीला प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर असतील.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर),रवि अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
1ST TEST. India XI: R Sharma (c), Y Jaiswal, S Gill, V Kohli, S Iyer, KL Rahul (wk), R Ashwin, S Thakur, J Bumrah, M Siraj, P Krishna. https://t.co/032B8Fn3iC #SAvIND
— BCCI (@BCCI) December 26, 2023
दक्षिण आफ्रिकेचा संघ –
टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को यानसेन, डेविड बेडिंघम, काइल वॅरेनी, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, आणि कगिसो रबाडा.
1ST TEST. South Africa XI: D Elgar, A Markram, T de Zorzi, T Bavuma (c), K Petersen, D Bedingham, K Verreynne (wk), M Jansen, G Coetzee, K Rabada, N Burger. https://t.co/032B8Fmvt4 #SAvIND
— BCCI (@BCCI) December 26, 2023
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी
1992 – दक्षिण आफ्रिका vs भारत (पोर्ट एलिजाबेथ) – दक्षिण आफ्रिकाने 9 विकेटने जिंकला
1996 – दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) – दक्षिण आफ्रिकाने 328 धावांनी विजय मिळवला.
2006 – दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) – दक्षिण आफ्रिकाने 174 धावांनी जिंकला.
2010 – दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) – भारताने 87 धावांनी सामना जिंकला.
2013 – दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) – दक्षिण आफ्रिकाने 10 विकेटने सामना जिंकला
2021 – दक्षिण आफ्रिका vs भारत (सेंचुरियन) – भारताने 113 धावांनी सामना जिंकला.
[ad_2]