[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Itel Smartphone : Itel चे स्मार्टफोन सध्या (Smartphone) चर्चेत आहे. Itel A70 हा नवीन स्मार्टफोन हा 8000 रुपये पेक्षा कमी किमतीत लॉंच करण्याची शक्यता आहे. हा फोन 12GB रॅमला सपोर्ट करेल, असं म्हटलं जात आहे. स्वस्त किंमतीच्या कॅटेगरीमध्ये Itel नवीन स्मार्टफोन लॉंच करणार आहे. लीक रिपोर्टच्या माहितीनुसार आयटेलचा अपकमिंग स्मार्टफोन Itel A70 असल्याचं सांगण्यात येत आहे. हा फोन स्वस्त आणि 12GB रॅममध्ये उपलब्ध असणार आहे. सोबतच हा आयटेलचा सगळ्यात पहिला स्मार्टफोन आहे जो 256GB स्टोरेजचा असणार आहे. यामध्ये 4GB रॅम सोबत 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात येणार आहे. एकंदरीत हा फोन 12GB रॅम सपोर्टसह येणार आहे.
किंमत किती असेल?
Itel A70 या स्मार्टफोनला भारतामध्ये 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केले जाऊ शकते. म्हणजे परत एकदा स्वस्त स्मार्टफोनच्या बाबतीमध्ये Itel मोठा धमाका करण्याचे वर्तवले जात आहे. जर स्पेसिफिकेशनच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा Itel A70 स्मार्टफोन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेटिव्ह फीचर्स सोबत येणार आहे.
स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
या फोनमध्ये डायनॅमिक बार फीचर असणार आहे.हा आयफोन 14 आणि आयफोन 15 सारखा असणार आहे ज्याच्यामध्ये इन्कमिंग कॉल आणि बॅटरी याची माहिती देण्यात येईल. हा फोन 6.6 इंच एचडी प्लस डिस्प्ले सोबत येईल ज्यामध्ये 90HZ हा रिफ्रेश रेट असणार आहे. याचा पीक ब्राईटनेस 500 nits असेल.त्यासोबतच 120Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल.हा कॅमेरा ड्युअल कॅमेरा सेंसर सोबत येईल ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेन्सर देण्यात येणार आहे.पावर बॅकअप साठी यामध्ये 5000mAhची बॅटरी देण्यात येईल.हा फोन एंड्रॉयड 13 ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करेल.या फोनची मेमरी 2TB पर्यंत वाढवली जाऊ शकते. स्वस्त किमतीमध्ये खूप चांगल्या फीचर्स हा फोन लॉन्च होणार आहे.
OnePlus 12R 4 जानेवारीला लाँच होणार…
OnePlus (OnePlus) लवकरच OnePlus Ace 3 आणि OnePlus 12R हे नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.OnePlus Ace 3 चीनमध्ये 4 जानेवारीला लॉंच केला जाऊ शकतो, तर OnePlus 12R 23 जानेवारीला OnePlus 12 सोबत जागतिक बाजारात लॉंच होण्याची शक्यता आहे. OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स असल्याचे समोर आले आहेत.आता Ace 3 ची लाँच तारीख जवळ येत असताना, ब्रँडने मोबाईलबद्दल माहिती देण्यासाठी एक पोस्टर पोस्ट केले आहे.
इतर महत्वाची बातमी-
Apple Watches Ban : Apple ला अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा धक्का; अमेरिकेत Apple watches वर बंदी; काय आहे नेमकं कारण?
[ad_2]