[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shoaib Malik and Sania Mirza : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) आज (दि. 20) तिसऱ्यांदा विवाह केलाय. स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा (Shoaib Malik) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. शोएब आणि सानिया यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर त्यांना इझान नावाचा मुलगा देखील आहे. इझान हा सध्या 5 वर्षांचा आहे. दरम्यान, आता शोएबने दुसरा विवाह केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता सानिया मिर्झाच्या (Sania Mirza) वडिलांनी याबाबत भाष्य केले आहे.
सानियाचे वडिल काय म्हणाले?
सानिया मिर्झाचे वडिल इम्रान मिर्झा यांनी शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत आणि घटस्फोटाबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, दोघेही संमतीने वेगळे झाले आहेत. हा “खुला” आहे.
सानियाच्या वडिलांनी सांगितलेला ‘खुला’ काय असतो?
कुराण आणि हदीसमधील नियमांनुसार, घटस्फोट आणि खुला यामध्ये मोठा फरक नसतो. एखादी महिला जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेते. तेव्हा त्याला खुला म्हटले जाते. तर वेगळे होण्याचा निर्णय पुरुषाने घेतला तर त्याला ‘तलाक’ म्हटले जाते. ‘तलाक’ घेतल्यानंतर महिला सलग 3 महिने आपल्या पतीच्या घरी राहते. कुराण आणि हदीसमध्ये याचा उल्लेख आहे. सानियाच्या वडिलांनी स्पष्ट केलय की, तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच हा खुला आहे.
कोण आहे सना जावेद? (Sana Javed)
सना जावेद (Sana Javed) ही सिनेक्षेत्रात काम करते. ती पाकिस्तानमध्ये नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. ती उर्दू टेलीव्हिजनवर नेहमी झळकते. सनाने 2012 मध्ये शहर-ए-जात मधून पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. ‘खानी’मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली होती. याच्यासाठी तिला लक्स स्टाईल अवार्डसाठी नामांकन मिळाले होते. सना जावेदने (Sana Javed) 2020 मध्ये गायक उमर जैस्वाल याच्याशी विवाह केला होता. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते वेगळे झाले होते. दरम्यान, सना जावेद आणि शोएब मलिक यांनी विवाह केला असला तरीही सानिया सोबत त्याने घटस्फोट घेतलाय का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिका सना जावेदला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. शोएब मलिकने गेल्या वर्षी सना जावेदला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान, विवाह झाल्यानंतर सना जावेदने इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे नावही बदलले आहे. ‘सना शोएब मलिक’ असे नाव तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला दिले आहे. शोएब मलिकचा हा तिसरा विवाह आहे. सानिया मिर्जा हिच्याशी विवाह करण्यापूर्वी
सानिया मिर्जाची पोस्ट व्हायरल (Sania Mirza)
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्जाने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक पोस्ट लिहिली होती. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. “लग्न अवघड आहे. घटस्फोटही अवघडच आहे. वाढलेलं वजन अवघड बाब आहे. त्याप्रमाणे फिट राहणंदेखील गरजेचं आहे. कर्जबाजारी राहणं अयोग्य आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नाही. पण योग्य मार्ग निवडणं तुमच्या हातात आहे.” अशी पोस्ट सानियाने केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Bollywood Actress : लग्न झाले, मुलं झाली अन् या 5 अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये काम मिळायचे मुश्किल झाले
अधिक पाहा..
[ad_2]