[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लंडन: WTC 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली खरी पण उर्वरित दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या नावे राहिला. पहिल्या दिवसाच्या खेळापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने शानदार शतकी खेळी खेळली. त्याने १५६ चेंडूत १४६ धावा केल्या. तर दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या खेळीची हीच लय कायम ठेवली होती आणि त्याने १५० धावांचा धावांचा टप्पाही गाठला. पण नंतर सिराजने त्याच्या या शानदार खेळीवर पूर्णविराम लावत त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. पण टाटापुर्वी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने आपल्या खेळी आणि संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे.ट्रॅव्हिस हेड म्हणाला की, निवड माझ्या हातात नाही. संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणे आणि माझ्या खेळाचा आनंद घेणे एवढेच माझ्या हातात आहे. हा खूप चांगला संघ आहे ज्यांच्यासोबत खेळायला मजा येते. ट्रॅव्हिस हेड पुढे म्हणाला की, ‘मला प्रत्येक कसोटी सामना खेळायला आवडेल, पण तसे होणार नाही. आशा आहे की या खेळीनंतर मला भविष्यात फारसे संघातून वगळले जाणार नाही. हे शक्य नसेल तर मला त्यात काही अडचण नाही.
खरे तर ट्रॅव्हिस हेडला भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान संघातून वगळण्यात आले होते. तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण असे असतानाही त्याला नागपूर कसोटी सामन्यात खेळवण्यात आले नाही.
खरे तर ट्रॅव्हिस हेडला भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान संघातून वगळण्यात आले होते. तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण असे असतानाही त्याला नागपूर कसोटी सामन्यात खेळवण्यात आले नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून पहिल्याच षटकात स्मिथने दोन चौकार लगावत आपले शतक पूर्ण केले. पण नंतर सिराजच्या सहाव्या षटकात तो श्रीकर भरतकडून झेलबाद झाला आणि त्याची १६३ धावांची झंझावाती खेळी इथे संपली. त्यानंतर मैदानात आलेला कॅमेरून ग्रीनने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत इनिंगला सुरुवात केली पण तो केवळ ७ धावा करून बा डझझला. शमीच्या गोलंदाजीवर त्याला गिलने बाद करून पॅव्हेलियनमध्ये धाडले. आता सध्या मैदानात स्टीव्ह स्मितज आणि अलेक्स कॅरीची जोडी मैदानात असून ९५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५ बाद ३७६ धावा आहे.
[ad_2]