Shubman Gill May Be Banned By ICC After WTC Final ; शुभमन गिलवर येऊ शकते दोन सामन्यांची बंदी,

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : शुभमन गिलवर आयसीसीने आता ११५ टक्के दंड आकारला आहे. पण त्यानंतर आता गिलवर आयसीसी बंदी घालू शकते. कारण हा दंड केल्यावर पुढे आयसीसी काय करू शकते, याचा नियम आता समोर आला आहे.विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गिल वादग्रस्तपणे बाद झाला. गिल बाद होता की नाही, यावर जोरदार चर्चा झाली. तिसऱ्या पंचांनी गिलला बाद करण्यात घाई केली,असेही बऱ्याच जणांनी म्हटले. पण पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि त्यानुसार गिलला बाद देण्यात आले. पण त्यानंतर गिलकडून एक मोठी चूक घडली आणि तो आयसीसीच्या नियमांमध्ये अडकला.

गिल वादग्रस्त पद्धतीने बाद झाला, हे निश्चित. पण त्यानंतर गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये त्याला झेल नेमका कसा पकडला गेला, हे दाखवण्यात आले होते. एका पद्धतीने गिलने पंचांवर टीका केली होती. त्यामुळे ही गोष्ट आयसीसीला खटकली आणि त्यांनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली. आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल आयसीसीने त्याच्यावर १५ टक्के दंड आकारला आहे. त्यामुळे गिलला सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम द्यावी आयसीसीला दंडाच्या रुपात द्यावी लागणार आहे. पण या दंडाच्या कारवाईनंतर आता गिलवर दोन सामन्यांची बंदी येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

आयसीसीचा नियम नेमका आहे तरी काय, जाणून घ्या….
एखाद्या खेळाडूकडून मोठी चूक किंवा आक्षेपार्ह कृती घडली तर त्याला आयसीसी डिमेरीट गुण देत असते. गिलकडून चूक झाल्यावर त्याला आता एक डिमेरीट गुण देण्यात आला आहे. जर एखाद्या खेळाडूला २४ महिन्यांत चार डिमेरीट गुण मिळाले तर त्याच्यावर बंदी घालण्याचा अधिकार आयसीसीला आहे. जर एखाद्या खेळाडूचे ४ डिमेरिटी गुण झाले तर त्याच्यावर दोन मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी किंवा एका कसोटी सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे आता गिलने जपून वागणे गरजेचे आहे.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

गिलकडून जर अजून एक चूक घडली तर त्याला २ किंवा ३ डिमेरीट गुण दिले जाऊ शकतात.

[ad_2]

Related posts