Devendra Fadnavis take jibe on Uddhav Thackeray over his visit in nashik kalaram mandir on 22 jan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : आमच्या मनात काटा रुतला होता, कलंक असलेला ढाचा मनात टोचत होता, आम्ही नारा दिला रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे, मोदींनी शिलान्यास केला आणि त्याचं ठिकाणी मंदिर होत आहे. हे मंदिर नाही, पाचशे वर्षाची गुलामगिरी संपवली जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोलापूर (Solapur) दौऱ्यात केले. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली. 

कोणी नाशिकला जातंय, कोणी कुठं जातंय

देवेंद फडणवीस यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित न राहणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर तोफ डागली. ते म्हणाले की, काही लोकं रा मंदिर कार्यक्रमला जायला तयार नाहीत, हे कोण आहेत? कोणत्या तोंडाने जातील? ज्यांनी रामाला विरोध केला. 2007 साली कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन सांगितलं, राम इथं जन्मला असल्याचा पुरावा नाही. प्रभू श्रीराम तुमच्याशी नजर मिळवणार तरी कसं? राम प्रश्न विचारेल की तू अस्तित्वावर प्रश्न विचारलं आज का आला? पण काळजी करू नका, प्रभू राम तुम्हालाही आशीर्वादचं देईल. 

कोणी नाशिकला जात आहे, तर कोणी कुठं जात आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, आसन आणि सिंहासन उबवणारे नेते आता नाहीत, जनतेचे काम करणारे नेते आहेत. त्यामुळे आमच्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद मिळाला तर तुमच्या कायापालट करू, असेही त्यांनी सांगितले. 

15 हजार गरिबांना मोदींच्या हस्ते चाव्या आम्ही दिल्या

त्यांनी सांगितले की, हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. 15 हजार गरिबांना मोदींच्या हस्ते चाव्या आम्ही दिल्या.  आज पंतप्रधानांमुळे गरिबांना 5 लाखात घर मिळाले. त्यामध्ये अडीच लाख रुप्ये शासनाने दिले. त्या घरात सोलर, शाळा, आरोग्य केंद्र, विरंगुळा केंद्र असे सगळं काही तिथं आहे. उच्च मध्यमवर्गीय लोकांचे घर असावे अशीच कॉलनी या ठिकाणी झाली.  गरिबांच्या कल्याणबाबतीत जो संकल्प केलाय त्याची सुरुवात सोलापुरातून झाली आहे. स्वामी समर्थ्यांच्या नगरीत आज ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धारचे भूमिपूजन पार पडले. 

सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा करून तीस कोटी निधी आणला 

ते पुढे म्हणाले की, या ठिकाणी इतके भाविक येतात. मात्र, बसस्टॅन्ड अतिशय खराब होते. सुविधा त्या ठिकाणी नव्हत्या. सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा करून तीस कोटी निधी आणला आणि अत्याधुनिक बस स्टॅन्ड होत आहे. माता भगिनींसाठी पन्नास टक्के सवलत मिळेल. संधी अनेकांना मिळते, त्याचं सोनं करने कमी लोकांना जमतं ते सचिन कल्याणशेट्टी यांना जमलं आहे. 27 वर्षे पाण्याचा प्रश्न रखडलेला होता, पहिल्यांदाच अक्कलकोटला पाणी पोहोचवण्याचे काम सचिनने केले, त्यामुळे त्याला पाणीदार आमदार म्हणतात. कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम केंद्र आणि राज्य शासनाने केले, तुम्ही मागणी केलेला अक्कलकोट कोरसेगाव रस्ता देखील आम्ही येणाऱ्या काळात करू. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts