NCP Leader Supriya Sule Statement On Pralhad Singh Patel In Baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supriya sule : बाहेरून यायचं आणि आमची चेष्ठा करायची, महाराष्ट्रात येऊन हा मिजास दाखवायचा नाही, तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला आहे. प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्या बोलत होत्या.

मागच्या आठवड्यात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी इंदापुरमध्ये जाऊन जल जीवन मिशनचे उद्धाटन केलं. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार आणि लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले नव्हते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही बाहेरून येऊन आमची चेष्ठा करणार, हे नाही चालणार. ज्यावेळी पार्लमेंटमध्ये त्यांचा प्रश्न येईल ना त्यावेळी मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार. इथे येऊन मिजास नाही दाखवायचा. इथे मानसन्मान देणार, इथे काही नाही बोलणार. अथिती देवो भवं. तुमचा कार्यक्रम मी पार्लमेंटमध्येच करणार, म्हणजे सगळ्या देशाला समजेल. त्यामुळे इथे येऊन चिखलफेक केली तर त्याला पार्लमेंटमध्ये उत्तर मिळणार. कारण हे मंत्री पार्लमेंटमध्ये खूप चुका करतात, आपण आपलं वयाचा मानसन्मान ठेवतो म्हणून काही बोललो नाही. 

‘मिंधे सरकार म्हणणं पटू लागलं

“कालच एक बातमी ऐकली की, भारतीय जनता पक्षाने शिंदे सरकारला सांगितले आहे की तुमचे पाच मंत्री काढून टाका. मी विचार करते काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सांगू शकत नाहीत की कोणी कोणाला मंत्री करायचे. कॉंग्रेसने त्यांचे मंत्री करायचे आणि बाकी पक्षांनी त्यांचे मंत्री करायचे. उद्धवजी म्हणायचे की हे मिंधे सरकार आहे. ती आता मला आता पटू लागले आहे. या सरकारने गद्दारी केली यात काही वाद नाही. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला. ते हयात असताना पक्ष उद्धव ठाकरेंना दिला. त्यामुळे तो पक्ष कोणाला घ्यायचा अधिकार नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे. सातत्याने मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचा सातत्याने केंद्र व राज्य सरकार करत आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला आहे. 

[ad_2]

Related posts