[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
युवराजने नोव्हेंबर २०२१ साली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर युवीने व्यवसायात उडी घेतली. सध्या त्याची एकूण संपत्ती ४० मिलियन युएस डॉलर म्हणजे ३२० कोटींच्या पुढे आहे. जाणून घेऊयात युवराज कोणता बिझनेस करतो आणि त्याची इतकी संपत्ती कशी काय निर्माण झाली.
भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये युवराजचा समावेश होतो. यामुळेच फक्त क्रिकेटमधून नाही तर विविध कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये युवी दिसतो. या जाहिरातींमधून त्याला मोठी कमाई होते. युवराजचा समावेश जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते. युवी पेप्सी, बिर्ला सन लाइफ, रिबॉक, प्यूमा, कॅडबरी, वर्लपूल, रॉयल मेगा स्टॅग, एलजी आणि रिव्हायटल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहीरातीत दिसतो. या जाहिरातींमधून त्यांने मोठी कमाई केली आहे.
जाहिरातींशिवाय युवराजने चित्रपटात अभिनय देखील केला आहे. युवराजचे वडील योगराज सिंह यांचे पंजाबी चित्रपटात मोठे नाव आहे. युवराजला यातून देखील मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात.
जाहिरात आणि चित्रपटाशिवाय युवीने अनेक छोट्या आणि मोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये वेलवर्स्ड या स्टार्टअप कंपनीचा समावेश आहे. यात युवराजची मोठी गुंतवणूक आहे. या शिवाय युवराजने स्वत:ची कंपनी YouWeCan Venturesच्या माध्यमातून अनेक कंपन्यात गुंतवणूक केली आहे. यात हेल्थियंस, होलोसूट, जेटसेटगो, ईजीडाइनर सारख्या स्टार्टअपचा समावेश आहे. युवीने फिटनेस-स्पोर्ट्स सेंटरच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील जाहिरातीतून त्याची कमाई सुरू केली आहे. युवीकडे चंदीगढमध्ये एक आलिशान घर आहे. या घराची किंमत काही कोटींमध्ये आहे. त्याच्याकडे अनेक महाग गाड्या देखील आहेत.
युवीने भारताकडून ४० कसोटी, ३०४ वनडे आणि ५८ टी-२० मॅच खेळल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर १ हजार ९०० धावा, ३ शतक आणि ११ अर्धशतक आहेत. वनडेत ३६.५६च्या सरासरीने ८ हजार ७०१ धावा केल्या असून त्यात १४ शतक आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० मध्ये १ हजार १७७ धावा केल्या आहेत. फलंदाजीसोबत त्याने गोलंदाजीत कमाल केली आहे. कसोटीत १०, वनडेत १११ तर टी-२० मध्ये २९ विकेट घेतल्या आहेत.
[ad_2]