Deja Vu Meaning and Science Behind it Why It Happens; ८०% व्यक्तींना Deja Vu ची होते जाणीव, ही घटना घडली असल्याचा होतो भास, काय आहे यामागील विज्ञान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देजा वू मागील विज्ञान

देजा वू मागील विज्ञान

देजा वू नक्की का जाणवते यामागे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. न्युरोसायकियाट्रिक्सट डॉ. ओहा सुश्मिताच्या मते यामागे Memory Theory असू शकते. याच्यानुसार देजा वू तेव्हाच जाणवते जेव्हा आपण पहिली परिस्थिती विसरलेले असतो अथवा विसरलेल्याप्रमाणे हा अनुभव असतो.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सद्यपरिस्थिती आणि पहिल्या घडलेल्या अनुभवांमध्ये समानता असते. देजा वू या कथित समानता समजून घेण्यासाठी आणि मानण्यासाठी आपल्या मेंदूचा हा प्रयत्न असू शकतो.

वैज्ञानिकांनी लॅबमध्ये रिक्रिएट केला देजा वू

वैज्ञानिकांनी लॅबमध्ये रिक्रिएट केला देजा वू

देजा वू हे अत्यंत स्ट्राँग फिलिंग असून हे नक्की कशा पद्धतीने विकसित होतं हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे सायटिस्टने लॅबमध्ये देजा वू रिक्रिएट करण्यासाठी काही प्रयोग केले. काही लोकांना यात सहभागी करून घेतले. सायंटिस्ट एनी क्लिरी आणि त्यांच्या टीमने व्हर्च्युअल रियालिटीची मदत घेत देजा वू कशा पद्धतीने जाणवू शकते याबाबत प्रयोग केला.

अशा व्यक्तींसमोर लक्षात नसलेले अनुभवाचे वातावरण निर्माण करण्यात आले आणि त्याला Gestalt Familiarity Hypothesis असे नाव देण्यात आले.

(वाचा – जिभेचा कर्करोग झाल्यास प्लास्टिक सर्जरीने उपाय करता येतो का, काय म्हणतात तज्ज्ञ)

काय केला प्रयोग

काय केला प्रयोग

प्रयोग करताना क्लिरी आणि त्यांच्या टीमने देजा वू ट्रिगर करण्यासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींच्या अनुभवानुसार, एका ठिकाणी फर्निचर आणि अन्य सामान तसंच ठेवलं जसं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर त्या व्यक्तीला हा सीन नेव्हिगेट करायला सांगण्यात आला आणि त्याचे निरीक्षण करताना जेव्हा देजा वू जाणवले तेव्हाच या प्रयोग यशस्वी झाला. जेव्हा भूतकाळातील एखादी गोष्ट आठवत नाही मात्र ती जाणवते त्यालाच देजा वू म्हणतात.

(वाचा – चपाती आणि भात एकत्र खात असाल तर वेळीच व्हा सावध, या ५ आजारांना देताय आमंत्रण)

Deja Vu बाबत मॅट्रिक्स थिअरी

deja-vu-

देजा वू च्या अनेक थिअरी आहे मात्र सर्वात प्रसिद्ध थिअरी आहे ती म्हणजे मॅट्रिक्स थिअरी. हा आजार नसून याला सिम्युलेशन असं म्हटलं जातं. काही एक्सपर्ट्सच्या मते आपण ब्रम्हांडात जगत नाही. कम्युटर प्रोग्राममध्ये ज्याप्रमाणे ग्लिच असतो तोच ग्लिच आयुष्यात येतो, त्याला देजा वू अशी जाणीव म्हणून ओळखले जाते.

(वाचा – गरोदरपणात खाज येतेय? मग दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो कोलस्टेसिस)

कोणत्याही आजाराचा संकेत नाही

कोणत्याही आजाराचा संकेत नाही

Deja Vu ही अत्यंत कॉमन भावना आहे. कोणत्याही मनोवैज्ञानिक आजाराचा हा भाग नाही असं मानसशास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र काही माणसांना सततच्या ताणामुळे हे बऱ्याचदा फील होऊ शकते. ज्यांना मायग्रेन अथवा Anxiety आजार आहे त्यांच्या बाबतीत हे अधिक वेळा घडू शकते असं सांगण्यात येते.

[ad_2]

Related posts