Who Is Shyama Dey Shaw And Thilak Naidu Team India’s New Junior Selection Committee Members know The Details ;

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: बीसीसीआयने भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये बदल केले आहेत. व्हीएस तिलक नायडू यांची ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ज्यांच्याकडे १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना तयार करण्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे, मिठू मुखर्जीच्या जागी बंगाल आणि रेल्वेच्या माजी क्रिकेटपटू श्यामा शॉ यांची वरिष्ठ महिला राष्ट्रीय निवड समितीमध्ये निवड करण्यात आली. “क्रिकेट सल्लागार समितीने महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समितीमधील निवडकर्ता पदासाठीच्या अर्जांवर विचार केला,” असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.कोण आहेत व्ही एस तिलक नायडू

नायडू, माजी यष्टिरक्षक फलंदाज असून त्यांनी कर्नाटक, दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीसाठी ९३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले. ते ज्युनियर निवड समितीमध्ये एस शरथची जागा घेतील जे आता वरिष्ठ निवड समितीचा भाग आहेत. त्यांच्या आक्रमण शैलीसाठी ओळखले जाणारे, नायडू यांनी २०१३ ते २०१६ या कालावधीत KSCA कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले आणि २०१५-१६ हंगामात KSCA वरिष्ठ निवड समितीवरही काम केले.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

श्यामा शॉ यांच्याबद्दल देखील जाणून घ्या

५१ वर्षीय शॉ, डावखुऱ्या हाताच्या फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी १९९५ मध्ये तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, दोन अर्धशतके झळकावली आणि पाच विकेट घेतले. देशांतर्गत सर्किटमध्ये, शॉ १९८५ ते १९९७ दरम्यान बंगालकडून खेळल्या आणि १९९८ ते २००२ दरम्यान रेल्वेचे प्रतिनिधित्व केले. त्या दोन वेळा बंगालच्या निवडकर्त्याही होत्या. सप्टेंबर २०२० मध्ये नियुक्त झालेल्या मुखर्जी यांचा कार्यकाळ संपला आहे.

महिला निवड समिती: नीतू डेव्हिड (अध्यक्ष), रेणू मार्गारेट, आरती वैद्य, कल्पना व्यंकटाचा, श्यामा डी शॉ.

ज्युनियर क्रिकेट समिती: व्हीएस तिलक नायडू (अध्यक्ष), रणदेव बोस, हरविंदर सिंग सोधी, पथिक पटेल, कृष्ण मोहन.

[ad_2]

Related posts