[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL 2023 Playoffs Scenario: गुजरातने क्वालिफायमध्ये प्रवेश केलाय. दिल्ली आणि हैदराबाद या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 12 सामन्यात फक्त आठ गुण आहेत. दिल्लीने आठ सामने गमावले आहेत. एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदाराबादची अवस्थाही दैयनिय झाली. हैदराबादला 12 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत. या दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. प्लेऑफमधील आव्हान संपल्यामुळे हे दोन्ही संघ अधीक त्वेशाने आणि दमदारपणे मैदानात उतरतील… त्यांना पराभवाचा दबाव नसेल.. ते फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आणि शेवट गोड खेळण्यासाठी मैदानात उतरतील..दिल्ली आणि हैदराबाद संघाने आपल्या उर्वरित सामन्यात बाजी मारली तर चार संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपेल.. यामध्ये चेन्नई आणि मुंबई यासारख्या तगड्या संघाचा समावेश आहे.
हैदराबाद कुणाचे गणित बिघडवणार –
मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. पण हैदराबाद संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. ते इतर संघाचे प्लेऑफचे आव्हान संपवू शकतात.. किंवा गणित बिघडवू शकतात. हैदराबादचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात उर्वरित सामने खेळेल.
18 मे 2023 – हैदराबादचा संघ आरसीबीबरोबर घरच्या मैदानात दोन हात करणार आहे.
21 मे 2023 – वानखेडे मैदानावर हैदराबाद मुंबईसोबत दोन हात करणार आहे.
दिल्ली या संघाचे गणित बिघडवणार ?
दिल्लीला 12 सामन्यात साठ पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण दिल्ली इतर संघाचे प्लेऑफमधील गणित बिघडवू शकते. दिल्लीचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. यापैकी एक सामना पंजाबविरोधात आहेत.. तर दुसरा सामना चेन्नईसोबत आहे. 17 मे रोजी दिल्ली पंजाबसोबत भिडणार आहे. 20 मे रोजी दिल्ली चेन्नईसोबत दोन हात करणार आहे.
मुंबईसाठी प्लेऑफचे समिकरण काय ?
मुंबई इंडियन्सने उर्वरित एका सामन्यात विजय मिळवला तर एकूण 16 गुण होतील.. असे झाल्यास 16 गुणासंह प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी होते.. नेटरनरेट चांगला असला तरच 16 गुणासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकते.. सध्या मुंबईचा रनरेट मायनसमध्ये आहे. त्यामुळे हैदराबादविरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागले. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे, अखेरचा सामना होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सचा हैदराबादविरोधात पराभव झाला तर पाच वेळच्या विजेत्याचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल. मुंबई इंडियन्सचे फक्त 14 गुण होतील.. अशात नेटरनरेट मोठी भूमिका बजावू शकते. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही मुंबईचे प्लेऑफमधील स्थान ठरू शकते.
[ad_2]