[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
टायटनचा स्फोट अवघ्या २० मिलीसेकंदांत झाला. इतक्या कमी अवधीत पाच जणांचा जीव गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू वेदनारहित होता. मेंदूला काही कळण्याआधीच होत्याचं नव्हतं झालं. मृत्यूची प्रक्रिया अतिशय कमी वेळेत पूर्ण झाली. कोणत्याही वेदना, यातनांशिवाय पाचही जणांचा जीव गेला. मात्र या पाचही जणांचे मृतदेह सापडणं अतिशय कठीण असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
टायटन पाणबुडीचं काय झालं?
खोल समुद्रात पाणबुडी गेल्यानंतर त्यावर बाहेरुन जोरदार दाब निर्माण झाला. पाणबुडीच्या निर्मितीत काही त्रुटी होत्या. दाबपात्रात टायटॅनियम आणि कार्बन फायबरचा वापर झाला होता. समुद्रात पाणबुडी ३०० मीटरपेक्षा अधिक खोल जात असल्यास त्यातील दाबपात्र तयार करण्यासाठी टायटॅनियमचा वापर केला जातो. टायटॅनियम धातू दबाव उत्तमपणे सहन करतो. गरजेनुसार तो आंकुचन, प्रसरण पावतो.
कार्बन फायबर मात्र अतिशय कठोर असतो. भिन्न गुणधर्म असलेल्या दोन धातूंचा वापर झाल्यानं दाबपात्र प्रभावी नव्हतं. त्यामुळे पाणबुडी बाहेरुन निर्माण झालेला दबाव सहन करू शकली नाही. तिचा स्फोट झाला. दबाव बाहेरुन आल्यानं स्फोट आतील बाजूस झाला. अवघ्या २० मिलीसेकंदांत, पर्यटकांना काही कळायच्या आधी त्यांना मृत्यूनं गाठलं.
[ad_2]