Cheteshwar Pujara Smash BCCI After Dropped From Indian Team ; संघाबाहेर केल्यावर अखेर पुजाराने सौडलं मौन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर करत बीसीसीआयच्या निवड समितीने सर्वांनाच मोठा धक्का दिला. कारण अजिंक्य रहाणे वगळता सर्वच फलंदजा अपयशी ठरल्यावरही फक्त पुजाराला संघातून बाहेर काढण्यात आले. पण पुजारा यावेळी काही शांतत बसला नाही. पुजाराने याबाबत आता आपले मौन सोडले आहे. पुजाराने आता एक व्हिडिओ शेअर करत भारताच्या निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे.पुजारा ही भारतीय संघातील फलंदाजीची अभेद्य भिंत मानली जात होता. पुजारा फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. या विश्व अजिंक्य स्पर्धेच्या फायनलपूर्वी पुजारा हा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत सराव करत होता. पण तरीही तो या फायनलमध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर बीसीसीआयने पुजारावर चांगलाच राग काढल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर जेव्हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडण्यात आला तेव्हा कसोटी संघात पुजाराला स्थान देण्यात आले नाही. पुजारा तेव्हा काहीच बोलला नाही, पण आता मात्र पुजाराने निवड समितीला चोख उत्तर दिले आहे.

पुजारा हा सध्याच्या घडीला सराव करत आहे. भारतीय संघातून त्याला बाहेर काढले असले तरी त्याचे क्रिकेट मात्र थांबलेले नाही. कारण पुजारा जरी भारतीय संघातून खेळला नाही तर तो इंग्लंडमध्ये जाऊन कौंटी क्रिकेट स्पर्धा मात्र नक्कीच खेळू शकतो. त्यासाठी आता पुजाराने सराव सुरु केला आहे. या सरावाचा व्हिडिओ पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पुजाराने हा व्हिडिओ पोस्ट करताना दोन इमोजीही त्यावर पोस्ट केले आहेत. पहिल्या इमोजीमध्ये बॅट आणि बॉल दिसत आहे, तर दुसऱ्या इमोजीमध्ये रेड हार्ट आहे. या दोन्ही इमोजींचा अर्थ लावला तर माझे क्रिकेटवर अबाधित प्रेम आहे आणि ते कधीही कमी होणार नाही, असे पुजाराने या व्हिडिच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

बीसीसीआयने पुजाराला संघाबाहेर केले, पण निवड समितीला आता पुजाराने चोख उत्तर दिले आहे. पुजाराचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Related posts