Yashasvi Jaiswal Praised Rajasthan For Helping Him To Take Care Of My Finances So He Can Focus On Cricket; ना आई- वडील, ना कुटुंब, ना मित्र- परिवार; नेमकं यशस्वी जैस्वालने आता कोणाचे मानले आभार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयपीएल २०२३ मध्ये, राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या बॅटने आयपीएलमध्ये केलेला कहर सर्वांनीच पाहिला. राजस्थानचा संघ जर प्लेऑफमधून बाहेर पडला नसता तर नक्कीच यशस्वीने यंदाची ऑरेंज कॅप जिंकली असती. IPL 2023 मध्ये यशस्वीच्या बॅटमधून सर्वात वेगवान अर्धशतक झळकले. त्याने संपूर्ण स्पर्धेत राजस्थानसाठी एकूण ६२५ धावा केल्या. त्याने आपल्या या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात आपले स्थान मिळवले आहे. आता त्याने आपल्या या यशाचे श्रेय कोणाला दिले आहे जाणून घ्या.आपल्या फ्रँचायझीचे जोरदार कौतुक करणारे विधान त्याने केले आहे. यशस्वी जयस्वालचा विश्वास आहे की राजस्थान रॉयल्सने त्यांना कठीण काळात खूप साथ दिली आणि पैशाची कमतरता जाणवू दिली नाही.

यशस्वी जैस्वालने कोणाचे केले कौतुक

यशस्वी जैस्वालने राजस्थान रॉयल्सचे खूप कौतुक केले आहे. तो म्हणतो की जेव्हा तो आर्थिक संकटाशी झुंजत होता तेव्हा राजस्थान रॉयल्स त्याच्यासाठी देवदूत बनून आला होता. यावेळी तो म्हणाला, “आतापर्यंत मी सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या आहेत. मी प्रथम क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. यात मला राजस्थान रॉयल्सचा खूप पाठिंबा मिळाला. त्यांनी मला खूप आर्थिक सहाय्य केले आणि मी माझे पैसे कुठे गुंतवायचे हे देखील सांगितले. यामुळे मी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करू शकलो. मी फ्रँचायझीचे आभार मानू इच्छितो जे त्यांच्या खेळाडूंना अशा प्रकारे मदत करत आहेत.”

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

तसेच मी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट खेळत आहे आणि मी अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. माझ्यासाठी काय योग्य आणि माझ्यासाठी काय चूक हे मला माहीत आहे. आता मी अनुभवी झालो आहे आणि मी माझ्या खेळावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे आणि कमी चुका करत आहे.”

यासोबतच जैस्वाल पुढे म्हणाला की, मी अत्यावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. उदाहरणार्थ, चांगल्या आहारासाठी घरी राहणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि मला माझ्या कुटुंबासह खूप चांगले वाटते. माझ्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींकडे मी फारसे लक्ष देत नाही.

[ad_2]

Related posts