ICC World Cup Qualifiers 2023 Netherlands Beat West Indies In Super Over; वेस्ट इंडिजचा सुपर ओव्हरमध्ये गेम! नवख्या संघाकडून लाजिरवाणा पराभव, वर्ल्डकपमधून पडणार बाहेर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हरारे: वेस्ट इंडिजने सुरुवातीच्या दोन एकदिवसीय विश्वचषकांवर नाव कोरले होते. तिसऱ्यामध्येही संघाने अंतिम फेरी गाठली होती पण तेव्हा भारताने बाजी मारत इतिहास रचला होता. पण आता २०२३ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिज खेळण्याची शक्यता कमी आहे. विश्वचषक २०२३ च्या पात्रता फेरीतील गट सामन्यात झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर, वेस्ट इंडिजला नेदरलँडकडूनही पराभव पत्करावा लागला आहे. वेस्ट इंडिजने प्रथम खेळताना ३७४ धावा केल्या. नेदरलँड्सनेही त्यांच्या डावात ३७४ धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने ३० धावा केल्या. पण दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ दोन गडी गमावून केवळ ८ धावा करू शकला. त्यामुळे वेट इंडिज या सुपर ओव्हरच्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्याने आता त्यांच्या विश्वचषक २०२३ मधील आशा हळू हळू कमी होत आहेत.वेस्ट इंडिज यंदाच्या विश्वचषकाला मुकणार

हा सामना हरल्यानंतरही वेस्ट इंडिज सुपर-6 साठी पात्र ठरला आहे. मात्र संघ शून्य गुणांसह तेथे पोहोचला आहे. कारण त्याने त्यांच्या गटातील झिम्बाब्वे किंवा नेदरलँड्समधील कोणावरही विजय मिळवला नाही. आता झिम्बाब्वेचे ४ गुण आहेत. दुसऱ्या गटातून श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान पोहोचले आहेत. सुपर-6 मधील टॉप-2 संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

वेस्ट इंडिजने या तिन्ही संघांना पराभूत केले तरी केवळ ६ गुण होतील. दुसरीकडे, झिम्बाब्वे एक सामना जिंकून ६ गुणांवर पोहोचेल. झिम्बाब्वेचा रनरेटही खूप चांगला आहे. यासह श्रीलंका आणि स्कॉटलंडमधील संघ ६ गुणांसह सुपर-6 मध्ये पोहोचतील. जर झिम्बाब्वेने सुपर-6 मधील दोन सामने जिंकले तर वेस्ट इंडिजला २०२३ चा भारतात होणारा विश्वचषक खेळता येणार नाही.

काय घडलं मॅचमध्ये?

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ६ बाद ३७४ धावा केल्या. निकोलस पूरनने मधल्या फळीत ६५ चेंडूत १०४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. ब्रँडन किंगने ७६ आणि जॉन्सन चार्ल्सने ५४ धावा केल्या. अखेर २५ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने ९ गडी गमावून ३७४ धावा केल्या. तेजा निदामनुरूने ७६ चेंडूत १११ धावांची खेळी केली. स्कॉट एडवर्ड्सने ६७ धावा केल्या.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

लोगान व्हॅन बीक नेदरलँडसाठी हिरो ठरला

लोगान व्हॅन बीक नेदरलँड्सच्या विजयाचा हिरो ठरला. सुपर ओव्हरमध्ये त्याने जेसन होल्डरविरुद्ध ३ षटकार आणि ३ चौकार मारून ३० धावा केल्या. येथून वेस्ट इंडिजचा पराभव निश्चित झाला. त्याने नेदरलँडसाठी सुपर ओव्हरमध्येही गोलंदाजी केली. व्हॅन विकने दोन्ही फलंदाजांना ८ धावांवर बाद केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

[ad_2]

Related posts