[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
धरमशाला: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पंजाब किंग्ज त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि या निर्णयाने प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. धरमशाला, हिमाचल प्रदेश येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३ च्या ६४ व्या सामन्यात पंजाब किंग्जला दिल्लीने २१४ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. पंजाबची सुरुवात काही खास झाली नाही आणि कर्णधार शिखर धवन एकही धाव न काढता बाद झाला. त्याचवेळी दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात शतक झळकावणारा प्रभसिमरन सिंगही २२ धावा करून बाद झाला. यानंतरही पंजाबने मात्र सामन्यात पूर्णत: कायम होता, जोपर्यंत अथर्व तायडे आणि लियाम लिव्हिंगस्टोन फलंदाजी करत होते.पंजाबच्या डावातील १४ षटके झाल्यानंतर पंजाबला विजयासाठी ३६ चेंडूत ९७ धावांची आवश्यकता होई. अथर्व तायडे आणि लीयं लिविंगस्टोन मैदानात चांगलेच सेट झाले होते आणि संघासताही महत्त्वाची फटकेबाजी करत होते. पुढच्या १५ व्या षटकात या दोघांनी मिळून ११ धावा कुटल्या. पण पंजाबच्या डावातील १५ षटके संपल्यानंतर अथर्व तायडे रिटायर आऊट झाला. तोपर्यंत पंजाबने १२८ धावा केल्या होत्या. पंजाबला विजयासाठी खूप धावा करायच्या होत्या तरी अथर्व पूर्णपणे क्रीजवर सेट झाला होता आणि लिव्हिंगस्टोनची त्याला चांगली साथ मिळत होती, पण पंजाब किंग्ज संघाने त्याला माघारी बोलावले. यातून दिल्ली कॅपिटल्सला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. अथर्व ५४ धावा करून बाद झाला.
पंजाब किंग्जचा फलंदाज अथर्व तायडे बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आव्हानाचा पाठलाग करताना रिटायर आऊट झाला. तायडे ४२ चेंडूत ५५ धावांवर फलंदाजी करत असताना जितेश शर्माला मिडल ऑर्डरमध्ये आणण्याच्या डावपेचात्मक निर्णय घेण्यात आल्याने अथर्व तायडेला माघारी बोलावले. पण हा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच भारी पाडला.
अथर्वनंतर जितेश शर्मा पंजाबकडून फलंदाजीसाठी आला, मात्र त्याला खातेही उघडता आले नाही. या पॉवर हिटरनंतर शाहरुख खानही काही खास कामगिरी करू शकला नाही. अशा स्थितीत सेट असलेल्या फलंदाजाला रिटायर आऊट करत पंजाबने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.
लिव्हिंगस्टोनचे शतक हुकले
एकीकडे पंजाब किंग्जचे फलंदाज सातत्याने बाद होत होते, तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोन दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यात एकटाच पुरेसा पडत होता. लिव्हिंगस्टोन ज्या प्रकारची झंझावाती फलंदाजी करत होता, त्याला एकदा वाटले होते की शेवटच्या तीन चेंडूत 16 धावा करून पंजाबचा संघ सामना जिंकेल, पण तसे होऊ शकले नाही. लिव्हिंगस्टोन संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही, तर त्याचे शतकही हुकले.
लिव्हिंगस्टोनने ४८ चेंडूत ९४ धावांची खेळी खेळली ज्यात त्याने ४ चौकार आणि ९ षटकार मारले. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनला बाद करत सामना १५ धावांनी जिंकला.
[ad_2]