Avoid Spam Calls How To Block Spam Call In Apple Iphone Check Here Full Process  

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Avoid Spam Calls : जवळपास प्रत्त्येक स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तीला स्पॅम कॉल्स (Spam Calls) आणि फसव्या संदेशांचा (Fake Messages) सामना करावा लागतो. यामुळं तुमचा वेळ वाया जातो आणि नाहक त्रासही होतो. तुम्हाला तुमच्या iPhone वर स्पॅम नंबर ब्लॉक करायचे असतील तर कसे कराल?  जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

स्पॅम नंबर कसे कराल ब्लॉक? 

1. तुम्ही ज्या व्यक्तीला ब्लॉक करु इच्छिता त्या व्यक्तीचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये अॅड असो किंवा नसो तुम्ही त्याला ब्लॉक करु शकता.
2. यासाठी प्रथम डायलर अॅप उघडा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या ‘i’ आयकॉनवर क्लिक करा. यानंतर नंबरच्या प्रोफाईलवर जा.
3. त्यानंतर या कॉलरला ब्लॉक करा. नंबर ब्लॉक करण्यासाठी ब्लॉक बटनवर प्रेस करा. 
4. जर तुम्हाला एकाचवेळी एकापेक्षा जास्त नंबर ब्लॉक करायचे असतील तर तुम्ही करु शकता.  

ब्लॉक केलेले नंबर कसे तपासायचे 

1. प्रथम सेटिंग्जमध्ये जा
2. त्यांनतर फोन या ऑप्शनवर जा.
3. Blocked Contacts चा पर्याय शोधा. यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्ही ब्लॉक केलेले सर्व नंबर तुम्हाला दिसतील. त्यानंतर Add New वर टॅप करा. याद्वारे तुम्ही येथे नवीन नंबर देखील जोडू शकता.
5. जर तुम्हाला एखाद्याला अनब्लॉक करायचे असेल तर तुम्हाला वरील एडिट वर टॅप करावे लागेल. त्यानंतर अनब्लॉक आयकॉनवर टॅप करा.

दिवसभरात अनेक स्पॅम कॉल येतात. यामुळं अनेकदा आपल्या कामात व्यत्यय येतो. या प्रकारचे कॉल ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. तसे, स्पॅम कॉल अनेक नंबरवरून केले जातात आणि ते ओळखणे खूप कठीण होते. अशात तुम्हाला कोणताही नंबर ब्लॉक करायचा असेल. तो, तुम्ही स्वतंत्रपणे ब्लॉक करू शकता. कारण, स्पॅम म्हणून चिन्हांकित नसलेल्या नंबरवरून तुम्हाला कॉल येऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या:

iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी; 12, 13 आणि 14 Pro वर बंपर ऑफर

[ad_2]

Related posts