VIDEO: इंग्लंडच्या समर्थकांनी उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरसोबत का केली हाणामारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी जॉनी बेअरस्टोच्या धावबादमुळे खळबळ उडाली. त्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या इंग्लंडच्या समर्थकांनी चीटर्स ऑस्ट्रेलिया अशा घोषणा दिल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर लंच ब्रेकमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या ड्रेसिंग रूमकडे जात असताना एका प्रेक्षकाने त्यांना शिवीगाळही केली.

त्यावेळी प्रकरण शांत झाले असले तरी जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त धावबादनंतर इंग्लंड समर्थकांमध्ये निराशा पसरली होती. कारण बेन स्टोक्सचा बेअरस्टो हा शेवटचा फलंदाज होता ज्याच्याकडून इंग्लंडचा विजय अपेक्षित होता. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही एमसीसी सदस्यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाताना ‘लाँग रूम’मध्ये गैरवर्तन केले.

उस्मान ख्वाजा
लॉर्ड्स हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. लॉर्ड्सवर नेहमीच आदर भावाने सगळ्यांना वागवले जाते, विशेषत: लाँग रूममधील सदस्यांकडून, पण आज तशी परिस्थिती नव्हती. हे खूप लाजिरवाणे आहे.

पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
काही सदस्यांच्या वर्तनाबद्दल एमसीसीने माफी मागितली. मला असे वाटते की त्यांच्यापैकी काही जण त्यांच्या वागण्यामुळे त्यांचे सदस्यत्व गमावू शकतात. त्या एका वेळेव्यतिरिक्त, संपूर्ण आठवडा छान गेला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खरं तर, डावाच्या ५२व्या षटकात बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा बाउन्सर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊ दिला. यानंतर चेंडू ‘डेड’ होण्यापूर्वीच तो क्रीज सोडून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या आपल्या जोडीदाराकडे गेला, त्याचवेळी यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीने चेंडू स्टंपवर आदळला.

हे बघून बेअरस्टो चकित झाला आणि मैदानावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे बोट दाखवले. रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने त्याला बाद दिले. बेअरस्टो निराशेने मान हलवत पॅव्हेलियनकडे निघाला. स्टोक्सने मैदानावरील पंचांसमोर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, लॉर्ड्सवर उपस्थित प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी ‘चीटर्स… चीटर्स…’ अशी घोषणाबाजी सुरू केली.

स्टोक्सने आपला राग ग्रीनवर काढला

बेअरस्टो बाद होईपर्यंत ६२ धावांवर फलंदाजी करणाऱ्या स्टोक्सने कॅमेरून ग्रीनवर आपला राग काढला. ग्रीनच्या षटकात त्याने तीन चौकार मारले. या गोलंदाजाच्या पुढच्या षटकात एक चौकार आणि नंतर हॅटट्रिक षटकार मारून त्याने शतक पूर्ण केले. या षटकात इंग्लंडने २४ धावा केल्या. स्टोक्सला ६२ धावांपासून शतक पूर्ण करण्यासाठी फक्त १६ चेंडू लागले.

[ad_2]

Related posts