Calculator न वापरता 10 सेकंदात हे समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? गणितानं अनेकजण गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Brain Teaser: छान पडणारा पाऊस, घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कामाचा आलेला कंटाळा आणि नेमकं काय करावं कळत नाही अशा वेळी तुमच्या बुद्धीला थोडी चालना मिळावी म्हणून एखादं कोडं सोडवण्यास सांगितलं तर? तुम्हाला खरोखरच काहीतरी डोक्याला ताण देणारं कोडं सोडवण्याची इच्छा असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं एक कोडं तुम्हाला डोकं खाजवायला लावू शकतं. खरं तर हे कोडं म्हणजे एक सोपं गणित आहे. मात्र हे गणित सोडवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदांचा वेळ आहे. 

नेमकं कोडं काय?

हे गणित सरळ आणि साधं सोपं वाटत असलं तरी ते सोडवण्यासाठी तुम्हाला तुमचं गणितामधील कौशल्य वापरावं लागणार आहे. हे गणित सोडवण्यासाठी कालमर्यादेबरोबरच कॅलक्युलेटर वापरायचं नाही अशीही एक अट आहे. ऐनी-मॅरी बिब्बी नावाच्या एका ट्वीटर युझरने हे कोडं घातलं आहे. ‘मला जाणून घेण्याची इच्छा आहे की मला जे उत्तर वाटतंय तेच किती जणांना वाटतंय,’ अशा अर्थाची कॅप्शन देत या कोड्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हे कोडं सोडवू शकता का पाहा बरं… कोडं असं आहे की 50 + 10 × 0 + 7 + 2 = ?

अनेक कमेट्स अन् 2 उत्तरं

तुम्हाला हे कोडं कॅलक्युलेटर न वापरता सोडवता येईल का? खरं तर हे कोडं 25 जून रोजी पोस्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काहींनी तुम्ही केवळ डावीकडून उजवीकडे जाण्याचा नियम वापरला तर गणिताचं उत्तर 9 असं आहे. मात्र तुम्ही गणिताच्या नियमांप्रमाणे सोडवलं तर उत्तर 59 आहे असं एकाने म्हटलं आहे. 

9 उत्तर कसं?

सरळ गणित सोडवत गेलं तर 50 + 10 × 0 चं उत्तर 0 असं येईल. या 0 मध्ये नंतर 7 + 2 चा समावेश केला तर 9 असं उत्तर येतं. मात्र अशा सरळ पद्धतीनं गणित सोडवणं चुकीचं आहे. हे नियमांमध्ये बसत नाही.

बरोबर उत्तर काय?

BODMAS या गणितामधील नियमानुसार आधी कंस सोडवावेत नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या नियामाने उत्तर शोधणं अपेक्षित असतं. गणिताच्या या नियमाप्रमाणे 50 + 10 × 0 ला 50 + (10 × 0) असं पाहिलं पाहिजे. म्हणजेच 50  + 0 आणि त्यामध्ये नंतर 7 + 2 चा विचार करावा. म्हणजेच 50 + 7 + 2 = 59 असं उत्तर येतं.

Related posts