[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने कस्टम विभागानं जप्त केलंय. या प्रकरणी ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेनं तिच्या शरीरात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय कस्टम विभागाला आला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. कस्टम विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे. </p>
[ad_2]