[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ऋतुराज गायकवाड
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे नाव टी-२० संघात नाही हे सर्वात आश्चर्यकारक आहे. सलामीची जबाबदारी सांभाळणाऱ्या गायकवाडला वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सलामीवीर म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
रिंकू सिंग
आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियामध्ये जर कोणत्या खेळाडूला थेट एन्ट्री मिळेल तर तो रिंकू सिंग होता. ज्या गुणवत्तेने डाव्या हाताच्या फलंदाजाने कोलकाता नाईट रायडर्ससाठी फिनिशर म्हणून आणि एक महत्त्वाचा फलंदाज म्हणून कामगिरी केली ते पाहता सर्वांनाच ही खात्री होती की त्याला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळणार. पण तसे झाले नाही. रिंकू सिंगच्या जबरदस्त कौशल्याच्या टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर नक्कीच फायदा झाला असता.
जितेश शर्मा
धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने IPL २०२३ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना एक नाही तर अनेक मॅच-विनिंग खेळी खेळल्या. त्याची फलंदाजी इतकी भन्नाट होती की तो कधी सामन्याचा रोख बदलेल, याचा नेम नव्हता. १४ सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने १५६.०६ च्या स्ट्राईक रेटने ३०९ धावा केल्या. स्लॉग ओव्हर्समध्ये झटपट धावा करण्यात तो माहीर आहे.
शिवम दुबे
चेन्नई सुपर किंग्जमधील महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या अष्टपैलू खेळाडूने स्वत:ला खूप तयार केले. एकेकाळी हार्दिक पांड्याचा पर्याय मानल्या जाणाऱ्या दुबेने आयपीएल २०२३ मध्येही चांगली कामगिरी केली होती. डाव्या हाताने स्फोटक फलंदाजीसोबतच त्याला वेगवान गोलंदाजीही येते. आयपीएल २०२३ च्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचे दमदार षटकार आयपीएलमधील एक अविस्मरणीय गोष्ट असेल.
रवींद्र जडेजा
पाचवं नाव म्हणजे सर्वात मोठा धक्का देणारे नाव आहे. रवींद्र जडेजा संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ते वैविध्य देतो, जो कोणताही कर्णधार शोधत असतो. ऑगस्ट २०२२ पासून, तो टीम इंडियासाठी एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण खालच्या फळीत तो एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो.
[ad_2]