[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यावेळी पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी म्हटले आहे की, जर भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेला नाही तर त्यांचा देशही वर्ल्ड कपमधून माघार घेईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विश्वचषकात पाकिस्तानच्या भारत दौऱ्याबाबत एक समिती स्थापन केली आहे. ४१ वर्षीय क्रीडा मंत्री मजारी हे त्याचाच एक भाग आहेत. मजारी यांच्या म्हणण्यानुसार, जर भारताने आशिया चषकादरम्यान पाकिस्तानमध्ये खेळण्याऐवजी आपले सामने तटस्थ मैदानावर ठेवण्याची मागणी केली, तर आम्ही भारतात होणाऱ्या विश्वचषकादरम्यान आमचे सामने तटस्थ ठिकाणी खेळू.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एहसान-उर-रहमान-मझारी म्हणाले, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि हे माझे वैयक्तिक मत आहे की जर भारत आशिया चषकादरम्यान मागणी करत असेल, तर पाकिस्तानने विश्वचषकादरम्यानही तटस्थ ठिकाणी खेळण्याची मागणी केली पाहिजे. पाकिस्तान सरकारने स्थापन केलेल्या या समितीचे अध्यक्ष परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि त्यात ११ मंत्र्यांचाही समावेश आहे. ही समिती आपला अहवाल पंतप्रधानांना सादर करणार असून अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे.
याचसोबत पाकिस्तानचा संघ एका सुरक्षा पथक भारतात पाठवणार आहे. जिथे जिथे पाकिस्तानचे सामने होणार आहेत तिथे हे सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक पाहणी करेल. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी खेळणार आहे.
[ad_2]