[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
संजय बांगर आणि माईक हेसन यांचा करार पाच वर्षांसाठी होता, तो वाढवण्याची चर्चा जोर धरू लागली होती पण आता फ्रँचायझी या दोघांना सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. आयपीएलच्या १६ हंगामांपैकी आरसीबीला एकदाही चॅम्पियन बनता आलेले नाही. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ पुढील हंगामात संघात राहणार की नाही याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. संजय बांगर आणि माईक हेसन यांचे आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये चांगले संबंध होते परंतु काही वर्षांनंतर ते दोघेही आरसीबीपासून वेगळे होणार आहेत.
आरसीबीने तीनदा अंतिम फेरी गाठली पण…..
आयपीएलमधील बलाढ्य संघांमध्ये आरसीबीची गणना होते. या संघाला विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांची साथ लाभली आहे, पण दुःखाची गोष्ट ही आहे की संघ एकदाही चॅम्पियन होऊ शकला नाही. आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये तीन वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे आणि तिन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००९ मध्ये आरसीबीने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. यानंतर २०११ आणि २०१६ मध्येही फायनलपर्यंतचा प्रवास केला.
आरसीबी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात
माइक हेसन आणि संजय बांगर यांच्यानंतर आता आरसीबी संघ नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मात्र, फ्रँचायझी परदेशी प्रशिक्षक घेणार की भारतीय हे स्पष्ट झालेले नाही. आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीची कामगिरी काही खास राहिली नाही. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. अशा स्थितीत नवीन हंगामापूर्वी संघात काही मोठे बदल पाहायला मिळतील, असे मानले जात होते. अशा स्थितीत आता नव्या प्रशिक्षकासह नव्या सत्रात संघ नव्याने सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे.
[ad_2]