[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, ही ३० वर्षीय व्यक्ती शहरापासून दूर काम करत असे. घरी येणे-जाणे कमी होते, त्यामुळे तो अनेकदा पत्नी आणि मुलांच्या जन्मतारखेनुसार लॉटरीची तिकिटे काढत असे. हे तो बऱ्याच काळापासून करत होता. पण, आता त्याचे नशीब बदलले आहे, कारण त्याला अखेर लॉटरी लागली आहे.
त्या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांताची राजधानी हांगझोऊ येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलांच्या जन्मतारखांवरुन खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकीटावरुन ७७ दशलक्ष युआन म्हणजेच ९० कोटींहून अधिकची रक्कम जिंकली आहे. या व्यक्तीला तीन मुलं आहेत.
या व्यक्तीने या महिन्याच्या सुरुवातीला ३० युआन (सुमारे ३०० रुपये) मध्ये १५ लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. प्रत्येक तिकिटावर त्याने पत्नी आणि तीन मुलांच्या जन्मतारखांनुसार काळजीपूर्वक निवडलेल्या क्रमांकांच्या ग्रूपवर पैज लावली होती. लॉटरी प्राधिकरणाने ११ जुलै रोजी निकाल जाहीर केला तेव्हा ‘वू’ आडनाव असलेल्या व्यक्तीने लॉटरी जिंकली होती. तो म्हणाला की माझ्या प्रत्येक लॉटरीच्या तिकिटाला ५.१४ दशलक्ष युआनचे बक्षीस मिळाले आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीने एकूण ७७.१ दशलक्ष युआन जिंकले. झेजियांगमधील या वर्षीचे हे सर्वात मोठे लॉटरीचे बक्षीस आहे.
लॉटरी क्रमांकांमध्ये माझी पत्नी आणि माझ्या मुलांची जन्मतारीख आहे. मी या वर्षाच्या सुरुवातीपासून हे नंबर वापरत आहे. हे माझ्यासाठी चांगलं असेल असं मला वाटत होतं आणि तेच खरं ठरलं, असं वू ने सांगितलं. वू पुढे म्हणाले की त्यांनी त्यांची पत्नी आणि मुले लक्षात ठेवून त्यांच्या जन्मतारखेसह क्रमांक निवडले आहेत.
[ad_2]