Virat Kohli Record First Player To Score Fifty Hundred On 500th Match Fastest To Complete 76 Hundreds IND Vs WI 2nd Test Match

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. विराट कोहलीचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. ५०० व्या सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम विराट कोहलीने केला आहे. असा रेकॉर्ड याआधी कुणालाही करता आला नव्हता. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, धोनी अथवा राहुल द्रविड कुणालाही पाचशेव्या सामन्यात शतक झळकावता आले नव्हते. पण विराट कोहलीने हा कारनामा केला आहे. 

वेस्ट इंडिजविरोधात विराट कोहलीने २०६ चेंडूत १२१ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने ११ चौकार लगावले. विराट कोहलीने सुरुवातीपासून संयमी फलंदाजी करत धावसंख्येला आकार दिला. हे विराट कोहलीचे कसोटीतील २९ वे तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७६ वे शतक होय. ५०० व्या कसोटीत शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीने केलाय. 

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी – 

सचिन तेंडुलकर- 664 सामने.
महेला जयवर्धने- 652 सामने.
कुमार संगाकारा- 594 सामने.
सनथ जयसूर्या- 586 सामने. 
रिकी पाँटिंग- 560 सामने.
महेंद्र सिंह धोनी- 538 सामने.
शाहिद आफ्रिदी – 524 सामने
जॅक कॅलिस- 519 सामने.
राहुल द्रविड- 509 सामने
इंजमाम उल हक- 500 सामने.
विराट कोहली 500 सामने*.

विराट कोहलीची दमदार कामगिरी

विराट कोहलीने शतक झळकावत खास विक्रम केला आहे. विदेशात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. सचिन तेंडुलकरपेक्षा फक्त एक शतक मागे राहिला आहे. विराट कोहलीने विदेशात 28 शतके ठोकले आहेत. सचिन तेंडुलकरने विदेशात 29 शतके ठोकले आहेत. त्याशिवाय वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक शतके लगावण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकले आहे. याबाबत गावसकरांच्या एक शतक मागे आहे. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरोधात १३ शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरोधात १२ शतके लगावली आहेत. जॅक कॅलिसनेही विडिंजविरोधात १२ शतके झळकावली आहेत. एबी डिव्हिलिअर्स याने ११ शतकांना ठोकली आहेत.

विराट कोहलीने आतापर्यंत 111 कसोटी, 274 वनडे आणि 115 वनडे असे एकूण 500 सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 53.48 जबरदस्त सरासरीने 25500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 76 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या   254* इतकी आहे.



[ad_2]

Related posts