IND vs PAK Final Match Live Streaming : रविवारी २३ जुलैला भारत आणि पाकिस्तान सामना कुठे लाइव्ह पाहता येणार, जाणून घ्या योग्य चॅनेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना हा रविवारी २३ जुलै रंगणार आहे. हा रणसंग्राम पाहण्यासाठी दोन्ही देशांचे चाहते उत्सुक असतील. पण हा सामना नेमका कुठे लाइव्ह पाहायला मिळू शकतो, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आता अंतिम फेरीत पुन्हा दोन हात करणार आहेत. पण हा अंतिम फेरीचा सामना कधी सुरु होणार, याची माहिती समोर आली आहे. या सामन्यासाठी पंच दुपारी १२.३० वाजता मैदानाची पाहणी करतील. जर पाऊस पडला नाही तर या सामन्याचा टॉस हा दुपारी १.३० वाजता होऊ शकतो. त्यानंतर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर खेळाडू काही वेळ मैदानात आपला सराव करतील. टॉस झाल्यानंतर अर्ध्या तासात म्हणजेच दुपारी २.०० वाजता हा सामना सुरु होणार आहे. त्यामुळे रविवारी दुपारी २.०० वाजल्यापासून या सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येऊ शकतो. हा सामना स्टार स्पोर्ट्सच-१ या वाहिनीवर लाइव्ह पाहता येऊ शकतो.

भारतीय ‘अ’ संघाचे उदयोन्मुखाच्या आशिया कप वनडे स्पर्धेत सुरुवातीपासूनच मिळवलेले वर्चस्व रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीतही कायम राखण्याचे ध्येय आहे. जेतेपदाच्या लढतीत आज भारताचा सामना पाकिस्तान ‘अ’ संघाशी होईल. आयसीसी, आशिया कपसारख्या स्पर्धांतील भारत-पाकिस्तान लढतींत विजयासाठी फेव्हरिट निवडणे क्रिकेटप्रेमींसाठी कठीणच असते; पण या स्पर्धेतील कामगिरी बघता आज भारताचा वर चष्मा राहणार, असा अंदाज नक्कीच बांधता येईल. त्यातच अलीकडेच पार पडलेल्या स्पर्धेच्या साखळी लढतीतही भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. एक गोष्ट मात्र इथे आवर्जून नमदू करावी लागेल अन् ती म्हणजे भारताने गाफील राहून चालणार नाही. अतिआत्मविश्वास पराभव ओढवून घेऊ शकतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

शुक्रवारची बांगलादेशविरुद्धची उपांत्य फेरी याच वृत्तीचे ताजे उदाहरण आहे. भारताची सामन्यावरील पकड सैल झाल्यामुळे बांगलादेशने डोके वर काढण्याचा प्रयत्न केला होता. प्रेमदासा स्टेडियमवर भारताच्या २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने १८व्या षटकापर्यंत १ बाद ९४ अशी सुरुवात केली होती. निशांत सिंधू आणि मानव सुतार यांच्या प्रभावी फिरकीमुळे भारताने बांगलादेशला १६० धावांत गुंडाळले. या विजयात भारताचा कर्णधार यश धूलच्या ६६ धावांचा महत्त्वाचा वाटा होता, तसेच त्याच्या दर्जेदार क्षेत्ररक्षणाचाही इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

भारताच्या बहुतेक खेळाडूंनी योगदान दिले असून रविवारची जेतेपदाची लढतही त्यास अपवाद नसावी, असे सहाजिकच खेळाडू आणि संघव्यवस्थापनाला वाटते आहे.

[ad_2]

Related posts