Bhuvneshwar Kumar Changes His Instagram Bio Retirement Speculations Know Details News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhuvneshwar Kumar : भारतीय टीमचा ( Indian Team) वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमार याने आपल्या इंस्टाग्रामच्या (Instagram) बायोमध्ये नुकताच एक बदल केला आहे. त्याने त्याच्या बायोमधील इंडियन क्रिकेटर हा शब्द हटवला आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीम इंडियाचा हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भुवनेश्वरकुमारने भारतासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये शेवटचा सामना खेळला. त्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केलेले नाही. त्यातच आता त्याने इंस्टाग्रामच्या बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता भुवनेश्वरकुमार निवृत्ती घेणार का? या चर्चेला मोठे उधाण आले आहे.

त्याने केवळ आपल्या बायोमधून क्रिकेटर हा शब्द काढला आहे आणि फक्त भारतीय असे ठेवले आहे. त्याने केलेला हा बदल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांने त्याला ट्विट करून विचारले आहे, तू रिटायरमेंट घेत आहेत का? मात्र, याबाबत भुवनेश्वरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा विषय सध्या लोकांकरता चर्चेचा बनला आहे. भुवी आता 33 वर्षांचा आहे. पण तो जानेवारी 2022 नंतर भारताच्या वनडे संघात परतला नाही. तसेच, भुवीने त्याची शेवटची कसोटी जानेवारी 2018 मध्ये खेळली होती.

भुवनेश्वर कुमारचं करिअर

विशेष म्हणजे, भुवनेश्वर हा गेल्या काही काळापासून टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 63 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी 96 धावांत 8 बळी अशी आहे. भुवनेश्वरने 121 वनडेत 141 विकेट घेतल्या आहेत. त्याने 87 टी-20 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वरने इंडियन प्रीमियर लीगमध्येही प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलच्या 160 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या सामन्यात भुवनेश्वरने नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) दोन मेडन ओव्हर टाकून खास विक्रमाला गवसणी घातली होती. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारनं चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात त्यानं तीन षटकात 9 धावा देऊन करून दोन विकेट्स घेतल्या होत्या. ज्यात दोन मेडन ओव्हरचा समावेश होता. यापूर्वी भुवनेश्वर कुमारनं टी-20 क्रिकेटमध्ये दोन मेडन ओव्हर टाकले होते. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय गोलंदाज (Bowler)  ठरला होता.

 

इतर महत्वाच्या बातम्या

ODI World Cup 2023 : वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार, मोठी माहिती आली समोर

[ad_2]

Related posts