[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रियान २०१९ पासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. मात्र सातत्याने संधी मिळून देखील रियानला त्याचा फार फायदा घेता आला नाही. यावरून त्याला अनेकदा ट्रोल केले आहे. आयपीएलच्या करिअरमध्ये ५४ सामन्यात फक्त ६०० धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी १६ तर स्ट्राइक रेट १२४चा आहे. गोलंदाजीत त्याने ४ विकेट घेतल्या आहेत. असे असताना देखील रियानवर राजस्थानने विश्वास ठेवला आहे. अद्याप त्याचा फायदा राजस्थानला झाला नसला तरी देवधर ट्रॉफीत त्याने अशी खेळी केली ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती.
इस्ट झोनकडून खेळणाऱ्या रियानने नॉर्थ विरुद्ध १३१ धावांची वादळी खेळी केली. इस्ट झोनच्या फक्त ५७ धावांवर ५ विकेट गेल्या होत्या तेव्हा रियान फलंदाजीला आला. संघातील सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले होते. तेव्हा रियानने १०२ चेंडूत ५ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १३१ धावा केल्या. त्याने नॉर्थ झोनच्या संदीप शर्मा, हर्षित राणा, मयंक मार्कंडे आणि निशांत सिंधू यांची धुलाई केली.
फलंदाजी झाल्यानंतर रियान थांबला नाही. त्याने गोलंदाजीत देखील कमाल केली. १० षटकात रियानने ५७ धावात ४ विकेट घेतल्या. त्याच्या या अफलातून कामगिरीच्या जोरावर इस्ट झोनने मॅच ८८ धावांनी जिंकली. रियानने सहाव्या विकेटसाठी कुमार कुशाग्रसह २३५ धावांची भागिदारी केली. कुशाग्रने ८७ चेंडूत ९८ धावा केल्या. या जोडीच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर इस्ट झोनने ८ बाद ३३७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल नॉर्थला २४९ धावा करता आल्या.
[ad_2]