[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पहिला बदल…
भारतीय संघात यावेळी पहिला बदल हा अष्टपैलू खेळाडूमध्ये होऊ शकतो. पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या सामम्यात शार्दुल ठाकूरला वगळून अजून एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेलला जर संधी दिली तर एक अष्टपैलू खेळाडू भारताला मिळू शकतो. शार्दुलच्या जागी फिरकीपटू युजवेंद्र चहल हा दुसरा पर्याय असू शकतो. त्यामुळे चहल आणि कुलदीप ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते.
दुसरा बदल…
पहिल्या वनडेत सूर्याला संधी दिल्यावर रोहित शर्मा ट्रोल झाला होता. सूर्यालाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दुसऱ्या वनडेत सूर्याला संघाबाहेर केले जाऊ शकते. सूर्याच्या जागी दुसऱ्या लढतीसाठी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळू शकते. त्यामुळे हा दुसरा बदल भारतीय संघात होऊ शकतो.
तिसरा बदल…
भारतीय ंसघात तिसरा बदल हा शुभमन गिलच्या रुपात पाहायला मिळू शकतो. कारण गिल हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. वेस्ट इंडिजच्या आतापर्यंतच्या दौऱ्यात त्याला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात गिलला वगळून अन्य एका फलंदाजाला भारतीय संघात संधी मिळू शकते.
भारत-वेस्ट इंडिजदरम्यानच्या मालिकेतील दुसरी वन-डे क्रिकेट लढत आज, शनिवारी होणार आहे. मालिकेतील पहिली वन-डे भारताने जिंकली आहे. आता दुसरी वन-डे जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मात्र, त्याहूनही महत्त्वाचे असेल, ते फलंदाजीचा क्रम. पहिल्या लढतीत विजयासाठीचे लक्ष्य असल्याने भारताने फलंदाजीच्या क्रमात काही बदल केले. मात्र, हा प्रयोग फारसा काही यशस्वी झाला नाही. आता पूर्वीचाच फलंदाजीचा क्रम कायम राखण्यावर भारताचा भर असेल. त्यामुळे फलंदाजांकडून दमदार खेळीची अपेक्षा असेल.
[ad_2]