Jasprit Bumrah Named Captain In Indian Squad Announced For Ireland Tour ; आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, बुमराहचे कमबॅक, ऋतुराजला मिळाली नवीन जबाबदारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आता भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात आता युवा खेळाडूंची वर्णी लागली आहे.
भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. क्रिकेटचा प्रसार व्हावा आणि काही संघांना दिग्गज संघांशी दोन हात करण्याची संधी मिळावी, म्हणून या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना हा १८ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना २० ऑगस्टला होणार आहे. या टी-२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना हा २३ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका त्यापूर्वी संपणार आहे. पण भारतीय संघातील खेळाडूंना विश्रांती हवी, यासाठी युवा खेळाडूंसह हा संघ बीसीसीआयने निवडला आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातील संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार हे आयर्लंडला रवाना होतील.

या संघात मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माला संधी देण्यात आली आहे, त्याचबरोबर मुंबईच्या शिवम दुबेचाही समावेश करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यावेळी भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तो काही काळ इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत होता. त्यामुळे या दौऱ्यात त्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपमध्येही त्याला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आता या दौऱ्यात तो की कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

संघ – जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

[ad_2]

Related posts