New Feature Coming To Gmail App Delete All Mails At Once Know In Detail Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gmail New Feature : Gmail आजकाल सर्वजण वापरतात. आजकाल प्रत्येक काम Gmail च्या मदतीने केले जाते. सध्या कोणत्याही कामाकरता Gmail चे खाते असणे गरजेचे आहे. रोज अनेक कामाचे मेल Inbox मध्ये येत असतात. या मेलमुळे Gmail चे संपूर्ण स्टोरेज भरून जाते. त्यामुळे अनेकदा हे आलेले मेल डिलीट करणे गरजेचे आहे. पण फोनमधील मेल एकाच वेळी डिलीट करणे शक्य होत नाही. एका वेळी फक्त 50 मेल डिलीट करता येऊ शकतात. मात्र आता तुम्हाला 50 पेक्षा जास्त मेल डिलीट करता येणार आहेत. कसे ते जाणून घेऊयात.

सर्व मेल एकाच वेळी करता येणार डिलीट (All Mails Can Be Deleted At Once)

ट्विटरवर @AssembleDebug द्वारे एक पोस्ट शेअर केली गेली आहे, ज्यामध्ये आता Android साठी नवीन अपडेट आले आहे. या आलेल्या नवीन अपडेटमध्ये  ‘सिलेक्ट ऑल’ हा पर्याय दिसत आहे ज्याच्या मदतीने तुम्ही एका वेळी 50 हून अधिक मेल डिलीट केले जाऊ शकतात.  ‘सिलेक्ट ऑल’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचे सर्व मेल डिलीट केले जाऊ शकतात. प्रत्येक वेळी मेल डिलीट करण्याकरता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. सध्या, हे अपडेट iOS मध्ये येईल की नाही हे माहित नाही. अँड्रॉईड अॅपमध्ये हे फीचर कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

महत्वाचे मेल चुकवायचे नसल्यास Safe Listing फिचर वापरा

कित्येकदा आपल्याला महत्वाचे मेल मेल बाॅक्समध्ये दिसत नाहीत. त्यामुळे कामे वेळेवर होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत Gmail मध्ये यूजर्सकरता Safe Listing नावाचे फिचर देण्यात आले आहे. 

Safe Listing फिचर कसे वापरावे?

– सर्व प्रथम Gmail ओपन करा आणि सेटिंग्जवर जा.

– यानंतर All Settings मध्ये जावा आणि Filter पर्यायावर क्लिक करा. 

– आता Create New Filter पर्याय निवडा आणि नवीन फिल्टर तयार करा.

– येथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि Create Filter वर क्लिक करा.

– तुम्हाला आता एक पॉप-अप दिसेल ज्यात Never send this to spam या पर्यायावर क्लिक करा. 
 
– हे केल्यास तुमचे महत्वाचे मेल Inbox मध्ये येतील.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Shanti Swarup Bhatnagar Award : देशाला विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचे योगदान, कोण होते डॉ.शांती स्वरूप भटनागर?

Related posts