Ravindra Jadeja Big Comment on Kapil Dev Statement About Team India Arrogance; ‘अशा कमेंट्स तेव्हाच येतात जेव्हा…’ कपिल देव यांच्या विधानावर जडेजा पाहा नेमकं काय म्हणाला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद: भारत आणि वेस्ट इंडिजमधील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना आज म्हणजेच १ ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित आणि कोहलीला विश्रांती देत नवा संघ मैदानात उतरला होता. पण या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय संघाबाबत एक अनपेक्षित वक्तव्य केले होते. टीम इंडियाच्या खेळाडूंना पैशाचा गर्व झाला आहे…भारतीय खेळाडू अतिआत्मविश्वासाने भरलेले आहेत. पण आता टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कपिलच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच, भारतीय संघाला प्रथमच विश्वचषक जिंकून देणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, टीम इंडियामध्ये अहंकार निर्माण झाला आहे. खेळाडूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. याला प्रत्युत्तर देताना रवींद्र जडेजाने म्हटले आहे की, “ते हे कधी बोलले मला माहीत नाही. मी सोशल मीडियावर या गोष्टी सर्च करत नाही. पाहा प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. माजी खेळाडूंना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, पण सध्याच्या संघात अहंकार आहे असे मला वाटत नाही.”

रवींद्र जडेजाने पत्रकारांशी बोलताना कपिल देव यांच्या या कमेंटला थेट प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला की “संघ सामना हरतो तेव्हा अनेकदा अशा कमेंट येतात. आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि हा एक चांगला संघ आहे. इथे कोणाचाही वैयक्तिक अजेंडा नाही. प्रत्येकजण आपल्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि आपले १०० टक्के देत आहे.

जडेजानं चौकार लगावला अन् CSK च्या फॅनचं तोडफोड सेलिब्रेशन

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या पराभवानंतरच कपिल देव यांचे हे विधान एका मुलाखतीदरम्यान समोर आले आहे. दुसरीकडे, भारत आणि वेस्ट इंडिज मालिकेबद्दल बोलायचे तर, संघ मंगळवारी त्रिनिदादमध्ये तिसरा वनडे सामना खेळणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

[ad_2]

Related posts