Mukesh Kumar Quick 3 Wickets in IND vs WI 3rd ODI Watch Video; मुकेश कुमारने रचला भारताच्या विजयाचा पाया, त्या २१ चेंडूंत लिहिला वेस्ट इंडिजचा पराभव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी काही नवीन खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे संघातील सिनियर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना होती. यात काही प्रमाणात टीम इंडियाला यश मिळाले आहे असे म्हणता येईल आणि या यशात वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा वाटा आहे. कसोटी मालिकेत पदार्पण केल्यानंतर मुकेशने वनडे सामन्यातही आपली क्षमता दाखवली आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने नव्या चेंडूने कहर करत वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवून दिला.

टीम इंडियामध्ये फलंदाजीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र वेगवान गोलंदाजीत ती स्थिती सध्या दिसत नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया या आघाडीवर कोणतीही कसर सोडू इच्छित नाही, त्यामुळे बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेशचा विंडीज दौऱ्यावर समावेश करण्यात आला. पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने स्विंग करण्याच्या क्षमतेने प्रभावित केले. यानंतर मुकेशला एकदिवसीय मालिकेतही संधी मिळाली आणि त्याने येथे निराश केले नाही.

मुकेशचे ते २१ चेंडू

पहिल्या वनडेत भारतीय फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजला आपल्या जाळ्यात अडकवले, मात्र तिसऱ्या वनडेत वेगवान गोलंदाजांची पाळी होती आणि मुकेशने पाया रचला. ज्या खेळपट्टीवर टीम इंडियाने ३५१ धावांची मोठी धावसंख्या उभारली, त्या खेळपट्टीवर विंडीजचे फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच संघर्ष करताना दिसले. विशेषत: मुकेशने २१ चेंडूत वेस्ट इंडिजला गुडघे टेकायला भाग पडले.

डावाच्या पहिल्याच षटकात मुकेशने ब्रँडन किंगचा सतत पाठलाग करून त्याची शिकार केली. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या (डावाच्या तिसऱ्या) षटकात, काइल मेयर्सने पॉइंटच्या दिशेने धारदार चौकार मारला. मुकेशने मेयर्सचा हेतू लगेच ओळखला आणि हुशारी दाखवत राउंड द विकेटवर येऊन तोच चेंडू टाकला. मेयर्सने पुन्हा तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण यावेळी मुकेशच्या अँगलमुळे तो गडबडला आणि चेंडू थेट स्टंपवर आदळला.

मुकेशने चौथ्या षटकात वेस्ट इंडिजच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले जेव्हा त्याने विंडीजचा कर्णधार शे होपला तिसर्‍या चेंडूवर उत्कृष्ट आऊटस्विंगवर स्लीपमध्ये शुभमन गिलकडे झेलबाद केले. गिलनेही चांगला झेल घेत मुकेशला साथ दिली. मुकेशची ही ओव्हर मेडनही होती. म्हणजे भारतीय संघाला दुहेरी फायदा झाला. अशारितीने मुकेशने ३.३ षटकांत तीन विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.

यानंतर मुकेशला आणखी यश मिळाले नाही, परंतु उर्वरित गोलंदाजांना सामना पूर्ण करण्यासाठी चांगली संधी निर्माण केली. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ७ षटकात ३० धावा दिल्या आणि ३ विकेट घेतले. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अशी सुरुवात करून मुकेशने आगामी काळासाठी आशा निर्माण केल्या आहेत. आता टी-२० मालिकेतही हा फॉर्म कायम ठेवण्याचे त्याचे पुढील लक्ष्य असेल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

[ad_2]

Related posts