Samsung Galaxy F34 5G Launching Tommorrow Know In Detail About Features And Battery News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsung Galaxy F34 5G Launching : सॅमसंगच्या (Samsung) स्मार्टफोनचं वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांनाचा माहित आहे. कमी पैशांत जास्तीत जास्त फिचर्स उपलब्ध करून देणारा हा स्मार्टफोन तरूणाईत विशेष लोकप्रिय आहे. स्वस्तात मस्त असणारा सॅमसंगचा फोन Samsung Galaxy F34 5G उद्या (सोमवार, 7 ऑगस्ट) लाँच होणार आहे. तसेच कंपनीने या फोनच्या स्पेसिफिकेशन आणि डिझाईन संदर्भात देखील काही माहिती समोर आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सल सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. यासोबतच 6,000mAh बॅटरी देखील असेल.

6.5-इंच फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले

Samsung Galaxy F34 5G मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले असेल. टीझरनुसार, फोनचा पुढील भाग कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आणि वॉटरड्रॉप स्टाइल कटआउटने सुसज्ज असेल. 

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीकरता ठरेल फायदेशीर

कंपनीच्या मते, हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक आणि मिस्टिक ग्रीन कलरमध्ये उपलब्ध असेल.  सॅमसंगचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये खूप चांगले काम करू शकतो. फोनच्या स्टोरेजबद्दल, हे 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये असण्याची अपेक्षा आहे. तुम्ही मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज जोडू शकता. Samsung Galaxy F34 5G मध्ये 50MP (OIS) नो शेक कॅमेरा दिला जाईल. यामध्ये युजर्सना नाइटोग्राफी फीचर देखील दिले जात आहे. हे आत्तापर्यंत फक्त फ्लॅगशिप मालिकेत उपलब्ध होते पण आता Galaxy F34 5G मध्ये देखील दिले जात आहे. फोन स्पोर्ट फन मोडला देखील सपोर्ट करेल जे वेगवेगळ्या 16 इनबिल्ट लेन्स इफेक्ट ऑफर करेल. स्मार्टफोनमध्ये सिंगल टेक फीचर देखील देण्यात आले आहे जे एका शॉटमध्ये 4 व्हिडिओ आणि 4 फोटो घेऊ शकेल.

किंमत किती असू शकते?

टीझरनुसार, Samsung Galaxy F34 5G ची किंमत 16-17 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. हा फोन 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकता. फोनमध्ये 5G चे 11 बँड आणि स्मार्ट हॉट स्पॉट असतील. फोनमध्ये Exynos 1280-5nm प्रोसेसर आहे, जो तुम्हाला व्हिडिओ गेम खेळण्याचा उत्तम अनुभव देईल. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Instagram Threads Update : इंस्टाग्राम थ्रेड्समध्ये Search Option असेल, डेस्कटॉपवर देखील वापरता येईल; लवकरच येणार नवं फिचर

 

[ad_2]

Related posts