[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील संघर्ष यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाच चर्चेत राहिला. मैदानातून सुरू झालेला लखनऊ आणि आरसीबीमधील वाद सोशल मीडियावर अजूनही सुरूच आहे. गुजरातकडून लखनऊच्या पराभवाच्या अनेक स्टोरीज विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केल्या होत्या. यानंतर नवीनने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीचा पराभव आणि विराट कोहलीच्या विकेटवरव आंब्यासोबतची एक स्टोरी शेअर केली होती. आता आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने नवीनला आणखी एक संधी मिळाली आहे.आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध १९८ धावांचा बचाव करण्यात आरसीबी अपयशी ठरला. या पराभवामुळे विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसीबीचा पराभवानंतर नवीन उल हकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मीम शेअर केलं आहे. यामध्ये एक टीव्ही अँकर सतत हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतो आहे. नवीनने आरसीबी किंवा विराटचे नाव लिहिलेले नाही. पण, त्याची वेळ पाहता ही स्टोरी का टाकली गेली हे कळून येत.

विराट-नवीन वाद
मे महिन्याच्या सुरुवातीला एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नवीन-उल-हकला स्लेज केलं. सामना संपल्यावर खेळाडू हस्तांदोलन करतात, तेव्हा नवीन आणि कोहलीत वाद झाला. यानंतर संघाचा मेंटर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही बाचाबाची झाली. तेव्हापासून नवीन आणि विराटमध्ये वाद सुरू आहे.
लखनऊ प्ले-ऑफमध्ये खेळणार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला लखनऊ सुपर जायंट्स आता प्लेऑफमध्ये खेळणार आहे. लखनऊचा सामना २४ मे रोजी चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
[ad_2]