[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
– ‘बॉर्न टू सून : डेकेड ऑफ अॅक्शन ऑन प्रीटर्म बर्थ’ या अहवालात हवामान बदलाच्या परिणामांवर प्रकाश. गर्भधारणा, मुदतपूर्व प्रसूती आणि गर्भावस्था यावरील परिणामांचा अभ्यास.
– वातावरणातील बदलामुळे वादळ, पूर, दुष्काळ, वणवा आणि वायू प्रदूषण याशिवाय अन्न असुरक्षितता, पाणी किंवा अन्नजन्य रोग, स्थलांतर, संघर्ष आणि आरोग्य यंत्रणा या बाबींचा गर्भधारणेवर परिणाम.
– वायू प्रदूषणामुळे दर वर्षी ६० लाख मुदतपूर्व प्रसूती.
धोक्यामध्ये वाढ
– प्रसूतिपूर्व काळात हवामान बदलांचा हानिकारक प्रभाव. जीवाश्म इंधन जाळल्याने होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे दमा असलेल्या मातांमध्ये हा धोका ५२ टक्क्यांनी, तर अतिउष्णतेमुळे धोका १६ टक्क्यांनी वाढला.
– गरीब देशांमधील घरगुती वायू प्रदूषणामुळे १५.६ टक्के कमी वजनाची मुले आणि ३५.७ टक्के मुदतपूर्व प्रसूती
– गॅम्बियातील ९२ गर्भवती महिलांचा अभ्यास. अतिउष्णतेत प्रत्येक अतिरिक्त अंश सेल्सिअसमुळे गर्भावरील ताण १७ टक्के वाढतो, विशेषत: गर्भाच्या हृदयाची गती वाढवून आणि नाळेकडील रक्तप्रवाह मंदावतो.
भारतातील स्थिती काय?
– हवामान बदलानुसार धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये महिला व बालकांवर लक्ष केंद्रित करून अधिक गुंतवणुकीची आवश्यकता.
– हवामान बदलाच्या परिणामांचा माता आणि नवजात आरोग्याशी संबंध जोडणारे पुरावे मिळूनही त्याची राजकीय दखल नाही.
– माता आणि नवजात शिशूंच्या आरोग्यावरील पर्यावरणीय परिणामांकडे धोरणकर्ते आणि अन्य यंत्रणांचे दुर्लक्ष.
– सरकारने महिला आणि समुदाय गटांचे प्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी संघटना आणि इतर भागधारकांशी संवाद सुरू करण्याचे आवाहन.
[ad_2]