[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गुजरातच्या शुभमन गिलने तुफानी शतकी खेळी केल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट केलं की, “शुभमन मुंबईसाठी भारी खेळला”, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शुभमन गिलने धावांचा पाठलाग करताना आणखी एक शतक पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यासह आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये आपली जागा बनवली. यामुळे आरसीबीचा पराभव झाल्याचा सर्वाधिक आनंद हा मुंबई इंडियन्सला आणि मुंबईच्या चाहत्यांना झाला.
गुजरातविरोधात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९८ धावांचं लक्ष्य ठेवलं. यात विराट कोहलीचं धडाकेबाज शतकही होतं. विराटने या सामन्यात ३५ चेंडूत अर्धशतक तर ६० चेंडूत शतक झळकवलं. विराट या सामन्यातही नाबाद राहिला. विराटला फाफ डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांनी साथ दिली. विराटने फलंदाजीवेळी आरसीबीची एक बाजू लावून धरली. आरसीबीची धावसंख्या २००च्या जवळ नेऊन ठेवली. विराटने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. आरसीबीने विराटच्या शतकाच्या जोरावर ५ गडी गमवत १९७ धावा केल्या.
फलंदाजीनंतर गुजरातविरोधात फिल्डींग आणि गोलंदाजीही चांगली केली. पण शुभमन गिलही मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठीच मैदानात उतरला, असंच वाटत होतं. शुभमन गिल याने धडाकेबाज फलंदाजी केली. शुभमन गिल याने ५२ चेंडूत शतक झळकावलं. शुभमन गिलच्या या शतकाच्या जोरावर गुजरातने तगडा संघ असलेल्या आरसीबीवर विजय मिळवला. विराटने सलग दोन सामन्यात शतक झळकवलं. तर शुभमन गिलने आयपीएलमधील दुसरं शतक केलं. गिलने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकांसह शतक झळकावलं. गुजरातला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
TEAM | P | W | L | PT |
14 | 10 | 4 | 20 | |
14 | 8 | 5 | 17 | |
14 | 8 | 5 | 17 | |
14 | 8 | 6 | 16 | |
14 | 7 | 7 | 14 | |
14 | 7 | 7 | 14 | |
14 | 6 | 8 | 12 | |
14 | 6 | 8 | 12 | |
14 | 5 | 9 | 10 | |
14 | 4 | 10 | 8 |
[ad_2]