[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India Get New Covid Kit: पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology) नं देशातील नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. एनआयव्हीनं (NIV) एक थ्री इन वन टेस्टिंग किट शोधून काढलं आहे. या एकाच किटद्वारे एन्फ्लुएंझा ए, बी आणि SARS-CoV-2 अशा तीन संसर्गजन्य आजारांचा शोध घेणं शक्य होणार आहे. हे पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट आहे, जे एकच किट तीन आजारांची चाचणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
एनआयव्ही पुणेच्या इन्फ्लुएंझा विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पोतदार यांनी सांगितलं की, इन्फ्लूएंझा ए, बी आणि कोविड-19 शोधण्यासाठी किट मल्टीप्लेक्स सिंगल ट्यूब रिअलटाईम आरटी-पीसीआर चाचणी (Multiplex Single Tube Realtime RT-PCR Test) म्हणून ओळखलं जाईल. एका चाचणीद्वारे तीन संसर्गजन्य आजारांचा शोध घेणं शक्य होणार आहे. हे टेस्टिंग किट अत्यंत सोपा, वेळ वाचवणारा आणि कार्यक्षम मार्ग आहे, असं त्या म्हणाल्या. सिंगल ट्यूबचा मूलत: अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीकडून एकच नमुना वापरून, आम्ही अनेक संक्रमणांचं निदान करणं शक्य आहे.
“एकाच टेस्टिंग किटद्वारे तीन संसर्गजन्य आजार शोधण्याचा हा एक सोपा आणि वेळ वाचवणारा, कार्यक्षम मार्ग असेल. सिंगल ट्यूबचा अर्थ असा आहे की, मानवाकडून एकच नमुना वापरून आम्ही अनेक संसर्गजन्य आजारांचा शोध घेण्यात सक्षम असू शकतो. या टेस्टिंग किटमध्ये नमुन्याची स्वतंत्रपणे चाचणी करावी लागणार नाही. या तिन्ही संसर्गाची लक्षणं ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे या प्रकारचा किट विशेषत: आजारांची साथ येते तेव्हा उपयुक्त ठरतो.
डॉ पोतदार यांनी असंही सांगितलं की, 15 मे रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (Indian Council of Medical Research-ICMR) ) या सहयोगी संस्थेनं हे टेस्टिंग किट मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी कंपन्यांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) देखील मागितलं होतं. या टेस्टिंग किटमध्ये, कोविड-19 टेस्टिंग किटप्रमाणेच रुग्णाच्या नाक आणि घशाची लाळ वापरली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, हे टेस्टिंग किट एकाच नमुन्याचा वापर करून अनेक आजारांचं निदान करण्यासाठी सक्षम असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता ‘सामाजिक फायद्यासाठी तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्यास सक्षम’ करण्यासाठी परवानाधारक कंपन्यांना तंत्रज्ञान सोपवू इच्छित आहे.
Reels
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आजपासून ‘नोटबदली’ सुरू… जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
[ad_2]