[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
एकाच षटकात १९ धावा
भारतीय क्रिकेट संघाच्या डावातील पॉवरप्लेचे सहावे षटक अल्झारी जोसेफ टाकत होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तिलक वर्मा स्ट्राइकवर होता. षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही. कदाचित तिलकला हे काही पटले नाही आणि त्यानंतर त्याने अल्झारीला संपूर्ण षटकात झोडपून काढला.
तिलकने दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारून जोसेफला धक्का दिला. फक्त एक २० वर्षांचा तिलक मैदानात उंच आणि धाकड वेगवान गोलंदाजाची शाळा घेत होता. तिलकच्या या निर्भय रूपाने सर्वांची मने जिंकली. षटकातील शेवटचा चेंडू त्याने एकेरी घेत स्ट्राईक राखला. तिलकने त्या षटकात अल्झारी जोसेफला १९ धावा ठोकल्या.
तिलक झाला बाद
या मालिकेत तिलक वर्मा सतत स्वत:ला सिद्ध करत आहेत. या सामन्यातही त्याने चांगली सुरुवात केली. मात्र त्याचे मोठ्या डावात रूपांतर त्याला करता आले नाही. वर्मा १५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १८ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याच्या बॅटने ३ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र, रोस्टन चेसने वर्माला बाद करत अप्रतिम झेल घेतला.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. वेस्ट इंडिजला विजयासाठी भारताने १६६ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून सर्वाधिक ६१ धावांची खेळी सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून पाहायला मिळाली.
[ad_2]