Jay Shah and Rahul Dravid Special Meeting; जय शहा यांनी बोलावलं आणि राहुल द्रविड धावत-धावत पोहोचले, पाहा असं २ तासांत घडलं तरी काय…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बोलावले होते. त्यानंतर द्रविड लगेच जय शहा यांना भेटायला गेले. त्यानंतर या दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या दोन तासांच्या चर्चेत नेमकं घडलं तरी काय, याची माहितीही आता समोर येत आहे.

जय शाह यांनी नुकतीच राहुल द्रविडसोबत मियामीमध्ये भेट घेतली होती. क्रिकबझमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही बैठक दोन तास चालली. भारतीय संघ मियामी येथील मॅरियट हॉटेलमध्ये थांबला होता, मात्र वैयक्तिक भेटीसाठी अमेरिकेत पोहोचलेले जय शाह दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यामुळे फक्त राहुल द्रविड यांनाच त्यांनी भेटायला बोलावले होते. जय शहा यांचा निरोप मिळताच द्रविड हे त्यांना भेटायला गेले.

काय झालं बैठकीत?
भारतीय संघाला पुढील दोन महिन्यांत आशिया कप आणि विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत, त्यासाठी ही बैठक झाल्याचे समोर येत आहे. बंद दाराआड काय घडले याचा अंदाज बांधता येत असला तरी या बैठकीत दोन्ही मोठ्या कार्यक्रमांची आखणी झाली असावी हे स्पष्ट आहे. आशिया चषक आणि विश्वचषक पाहता कोचिंग स्टाफमध्ये काही वाढ होणार का, हाही प्रश्न कायम आहे. आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी २४ ऑगस्टपासून बंगळुरूमधील अलूर येथे मोठे शिबिर होणार आहे. त्यापूर्वी झालेली ही बैठक महत्वाची समजली जात आहे.

द्रविड यांना शेवटची संधी
भारतीय संघ अत्यंत वाईट टप्प्यातून जात असताना ही भेट घडली हे आपण विसरता कामा नये. संघातील खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि विशेषतः फलंदाजांच्या कामगिरीवर तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सुचवले की, “भारताला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेगळ्या प्रशिक्षकाचा फायदा होऊ शकतो.”

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

याशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक व्यंकटेश प्रसादने द्रविडच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खेळाडूंमध्ये जोश नसल्याचा उल्लेख केला.

[ad_2]

Related posts